भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात तोडणीला आलेल्या ऊसाचे क्षेत्राला आग लागल्याने एक एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने या शेतकर्यांचे अंदाजे ८० हजारांचे नुकसान झाले असून या वेळी विज पुरवठा खंडीत असताना या ऊसाला कशाने आग लागली की लावली गेली हे समजू शकले नसले तरी यापुर्वी या क्षेत्रात विजपम्पाचे, बॉक्सचे नुकसान करण्याचे प्रकार काळे यांचे लक्षात आल्याने या प्रकरणी पोलीसांत तक्रार करण्यात आली असल्याचे काळे परीवाराने सांगीतले आहे.
भोकर- मुठेवाडगाव रोड लगत काही अंतरावर असलेल्या गट नं.५११ मधील एक एकर ऊसाच्या क्षेत्राला येथील रावसाहेब कारभारी काळे यांच्या सुमारे बारा महिण्याच्या महणजेच तोडणीला आलेल्या ऊसाच्या क्षेत्राला दुपारी तीन वाजेच्या सुमारास आग लागल्याचे लगतचे शेतकरी विठ्ठल आबुज व त्यांचे नातूंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच ओरडा करत काळे कुटूंबाला ही सांगीतले. या ऊसाला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर लगतच्या शेतकर्यांसह भोकर सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब काळे, बाळासाहेब काळे, प्रतिक काळे, रावसाहेब काळे व दिपक काळे आदिंसह अनेकांनी हि आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतू तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान या परीसरातील शेतीच्या विज पम्पासाठीचा विझ पुरवठा दुपारी साडेबारा वाजेपर्यंत होता तर त्या नंतर ऊसाला आग कशी लागली, या ऊसाच्या क्षेत्राला आग लागली की लावली? या बाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याच बरोबर या ठिकाणी यापुर्वी याच शेतकर्यांच्या विजपम्पाच्या बॉक्सच्या फ्युज काढून फेकणे, विज पुरवठा खंडीत करण्यासाठी बॉक्स मधील वायरींग तोडणे, पाईप लाईनचे नुकसान करण्यासारखे खोडसाळपणाचे कृत्य घडले असल्याने या ऊसाला आग लावण्यात आली असल्याची शंका काळे कुटूंबांना असल्याने या प्रकरणी तालुका पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहीती रावसाहेब काळे यांनी सांगीतले.
या दुर्घटनास्थळी तालुका पोलीस ठाणे लवकरच या प्रकाराचा छडा लावणार असल्याचा विश्वास रावसाहेब काळे व काळे कुटूंबाने व्यक्त केला आहे.
भोकर - भोकर शिवारात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला रावसाहेब काळे यांचे ऊसाचे क्षेत्र छायाचित्रात दिसत आहे.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

