सामुदायीक हरकती दाखल करणारे खोकर हे गाव राज्यातील पहीले
श्रीरामपूर प्रतिनिधी:
राज्य सरकारने दि. २६ जानेवारी रोजी काढलेल्या मराठा आरक्षण संदर्भातील जी आर विरोधात हरकती मागविल्यानंतर, श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील ओबीसी बांधवांच्या सामुहिेपणे एकाच वेळी दोनशे एक्कावन्न हरकती पोस्टात टाकण्यात आल्या असल्याची माहिती येथील ओबीसी बांधवांनी दिली आहे. सामुदायीकपणे हरकती दाखल करणारे खोकर हे राज्यातील पहीले गाव असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
राज्य सरकारने दि. २६ जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबात जी आर काढला व त्यावर ज्या कुणाला हरकती असेल त्यांनी दि.१६ फेब्रुवारी पर्यंत आपल्या हकरती दाखल कराव्यात असे आवाहनानुसार खोकर येथील माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष संजय जगताप, माळी महासंघाचे महेश दारूंटे, रवी सिन्नरकर आदिंच्या मार्गदर्शनाखाली येथील ओबीसी बांधवांनी सामुहीकपणे २५१ हरकती खोकर येथील पोस्ट कार्यालयाद्वारे मुंबईकडे रवाना केल्या आहेत.
आम्हाला कुणाच्या ताटातले घ्यायचे नाही, तुम्ही तुमच्यासाठी स्वतंत्र ताट घ्या. तुम्हाला आरक्षण मिळावे म्हणून अहमदनगर येथील मोर्चात आम्ही ही तुमच्या मागणीला पाठींबा द्यायला आलो होतो. तुमच्या आरक्षणाला आमचा आजीबात विरोध नाही पण आमच्या नकोत कारण आमच्यात पहीलेच अनेक जातींचा समुह आहे त्यांनाच ते पुरत नाही.
आज ही तुम्ही स्वतंत्र आरक्षणाची मागणी केल्यास येथील बीसी, एस सी, एसटी सोबत ओबीसी सुद्धा तुमच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी सदैव सज्ज आहोत. मात्र फक्त आमच्या ताटातलं घेवू नका, ज्यांना स्वतंत्र ताट दिले त्यात कुणीही अतक्रमण करून ये म्हणून या सामुहिक हरकती राज्य सरकारकडे पाठविले असल्याचे यावेळी संबधीतांनी सांगीतले.
यावेळी खोकर पोस्ट कार्यालयात येथील रावसाहेब चक्रनारायण, लक्ष्मण चव्हाण, संजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य अमीन सय्यद, रवी सिन्नरकर व बाबुराव सिन्नरकर आदिंसह युवक उपस्थीत होते.
भोकर - ओबीसी आरक्षण विरोधात सामुहिक हरकती दाखल करताना रावसाहेब चक्रनारायण, लक्ष्मण चव्हाण, संजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य अमीन सय्यद, रवी सिन्नरकर व बाबुराव सिन्नरकर आदिंसह मान्यवर दिसत आहेत.
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकल
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

