shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत निरनिमगाव येथे आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ९ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत निरनिमगाव येथे आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ९ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन



इंदापूर:निरनिमगाव (ता.इंदापूर) येथे सोमवार(दि. १९ फेब्रुवारी) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ९ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडणार आहे. 
यावेळी बावडा निर निमगाव रस्ता ६ कोटी ७० लक्ष, आमदार फंडातून निरनिमगाव इंदिरानगर येथील तळ्याच्या कडेने रस्ता करणे ४० लक्ष, जोशी समाज सभा मंडप १० लक्ष, निरनिमगाव येथे नळ पाणीपुरवठा योजना करणे १ कोटी ७० लक्ष अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार असून सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मधुकर भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,  माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ,  युवा नेते दिपक जाधव, युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शुभम निंबाळकर, सोशल मीडिया प्रमुख हामा पाटील, नवनाथ रुपनवर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष साधनाताई केकाण व इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
close