श्रीरामपूर प्रतिनिधी:
आठ दिवसांपासून दिल्ली येथे तर भारतातील विविध ठिकाणी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने आंदोलन सुरू केले आहे, शेतकऱ्यांना शेतमालाच्या आधारभूत किमतीवर कायदा करण्यात यावा, देशातील शेतकऱ्यांची संपूर्ण कृषी कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्या केल्या आहेत.
देशातील शेतकऱ्यांना गेली कित्येक वर्षापासून वास्तव आधारभूत किमतीवर वस्तुनिष्ठ भाव न मिळाल्यामुळे सातत्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. केंद्र सरकारचे आयात - निर्यात धोरण हे शेतकरी विरोधी असून त्याचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसत आहे यामुळेच देशात दिवसेंदिवस दुर्दैवाने शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट बिगर मोसमी हवामान या नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागतो, गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्यांनी अनेक सरकारे केंद्रात व राज्यात बघितली व निवडून दिली परंतु प्रत्येक पक्षांनी व प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आपल्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी, उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव अशी आमीषे दाखवून शेतकऱ्यांची मते घेतली, सत्तेत गेले व सत्तेत गेल्यानंतर जाहीरनाम्यांचा, घोषणांचा सरकारला व पक्षांना सोयीस्कर विसर पडलेला आहे. आज रोजी देशातील कित्येक राजकीय घराणे सत्ताधारी पक्षात जाताना दिसत आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायचे नाही असे दिसून येते. त्यामुळे देशातील कोणता पक्ष हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा आहे ? असाही प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांनी सातत्याने अलटून- पटून सर्व पक्षांना संधी दिली परंतु एकाही राजकीय पक्षांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेतलेले नाही यामुळेच दिल्ली येथे शेतकऱ्यांचा असंतोष बघायला मिळत आहे, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व राज्य उपाध्यक्ष अडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वात खाली अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेने जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण करून दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर श्रीरामपूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने ११ ते ४ वाजेपर्यंत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणात जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदीक, साहेबराव चोरमल, प्रभाकर कांबळे, डॉ.विकास नवले, सुदाम औताडे, दिलीप औताडे, बबनराव उघडे, कडू पवार, नारायण पवार, विलास कदम, ऍडव्होकेट सर्जेराव घोडे, ऍडव्होकेट प्रकाश कापसे, शरद आसने, बाळासाहेब आसने, अनिल रोकडे,प्रवीण वाघ, बापूसाहेब पठारे, जानराव गोविंद, नाना वाघ आदि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
आंदोलक उपोषणकर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी महसूलचे श्रीरामपूर येथील कामगार तलाठी राजेश घोरपडे,पोलिस उपनिरीक्षक चोपडा, पो.हे.कॉं कदम यांनी निवेदन स्विकारले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

