परीसरातील शेतकर्यांत भितीचे वातावरण
बिबट्या जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी..
श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे चक्क भरदिवसा बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवत कालवड फस्त केल्याने खोकर येथील अशोक सलालकर या शेतकर्यांचे सुमारे तीस हजारांचे नुकसान झाले. त्याच बरोबर भरदिवसा झालेल्या या प्रकाराने परीसरात शेतकर्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून या परीसरात वनविभागाने पिंजरा लावून त्या बिबट्यास जेरबंद करावा अशी मागणी परीसरातील शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
खोकर व भोकर शिवारात गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याचा, बिबट्याच्या मादीचा उपद्रव सुरू आहे. यांच्या उच्छादामुळे खोकर व भोकर परीसरातील वाड्यावस्त्यावरील अनेक कुत्रे या बिबट्यांनी फस्त केल्याने गेल्या अनेक महिण्यांपासून परीसरातील वाड्यावस्त्याच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
या बिबट्याने अनेक शेतकर्यांवर हल्ला चढवत अनेक शेळ्या, बोकड व मेंढ्या फस्त केलेल्या आहेत परंतू या सर्व घटना रात्रीच्या सुमारास घडलेल्या आहेत मात्र काल रवीवार दि.१६ फेब्रुवारीच्या भरदिवसा व भरदुपारी दोन ते आडीच वाजेच्या सुमारास खोकर येथील शेतकर्याच्या घरासमोरील कालवड या बिबट्याने ओढून नेवून फस्त केल्याने परीसरातील शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
खोकर शिवारातील खोकर-निपाणीवाडगाव शिवारात गट नं.१९२ मध्ये वस्ती करून राहत असलेले अशोक रघूनाथ सलालकर यांच्या घरासमोर बांधलेली सहा महिने वयाची कालवड या बिबट्याने ओढून नेत फस्त केली. या बिबट्याने ही कालवड वस्तीपासून सुमारे हजार फुट अंतरावर नेवून फस्त केली. सुदैवाने या वेळी वस्तीवर कुटूंबातील कुणीच नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी भरदिवसा बिबट्याने हल्ला चढविण्याचा परीसरातील हा पहिलाच प्रकार असल्याने परीसरातील शेतर्यांच्या चिंतेत भर पडली असून परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशोक सलालकर हे घरी आल्यानंतर कालवड गायब असल्याचे लक्षात आले. परंतू ती कालवड शेतात सुटून गेली असेल म्हणून शोधाशोध सुरू झाली. काही वेळाने वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या गव्हाच्या शेताजवळील झुडूपात अर्धवट खाललेल्या कालवडीचे शव आढळल्याने तेथून पुढे त्यांची पाचावर धारण बसली, नेहमीच दिवसरात्र बिनधास्त शेतात फेरफटका मारणारे सलालकर यांना त्यांची वस्ती व घर दुर दिसायला लागले. कारण जवळपास कुठे बिबट्या असला तर त्यांना ही धोका दिसत होता परंतू कसे बसे सावरत त्यांनी वस्ती गाठत घडला प्रकार लगतच्या शेतकर्यांना सांगीतला तेव्हा पासून परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याने वनविभागाने या परीसरात तातडीने पिंजरा लावून या बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी परीसरातील शेतकर्यांकडून केली जात आहे.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

