*श्रमसंस्कार ही आयुष्य घडवण्याची गुरुकिल्ली- प्रताप पाटील*
इंदापूर: युवा अवस्थेतील श्रमसंस्कारामधून आयुष्याची जडणघडण होते. विद्यार्थ्यांच्या मनात देशाविषयी व समाजसेवा घडवण्याची रुजवणूक होते. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांनी शिबिर कालावधीत गावाचा जो विकास केला त्याला तोड नाही. असेच देश उपयोगी कार्य आपल्या आयुष्यात झोकून देऊन करा. त्यामुळे प्रत्येक युवकाचे श्रमसंस्कार हे आयुष्य घडवणारे गुरुकली ठरेल असे प्रतिपादन निमगाव गावचे सरपंच
बावडा येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निरनिमगाव गावात विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभ मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी निरनिमगाव गावचे ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच जि. प. शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे, डॉ. तानाजी लोंढे, कार्यक्रमाधिकारी प्रा. सुदर्शन गोळी, प्रा. प्राजक्ता बागल, प्रा. ऋतुजा वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रवीण घोगरे, मदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. लहू वावरे यांनी गावातील युवकांनी गावाचा विकास करण्यासाठी समाजाचे विविध अंगी प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येणे ही काळाची गरज आहे. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेले सात दिवस गावातील स्वच्छतेबरोबरच विविध योजनांची माहिती गावातील लोकांना दिली. सदर श्रमसंस्कार शिबिरामध्ये श्रमदानातून ग्राम स्वच्छता, 100 वृक्षारोपण, धार्मिक स्थळाची स्वच्छता, ग्राम सर्वेक्षण, लोकसंख्या नियंत्रण व पर्यावरण जनजागृती रक्तदान शिबिर, गावातील महिलांसाठी महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम, होम मिनिस्टर कार्यक्रम यामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायतच्या सहकार्यातून पहिल्या तीन क्रमांकास पैठणी, मिक्सर, व डिनर सेट बक्षीस देण्यात आला, शिवार फेरी, गावकऱ्यांसाठी समाज प्रबोधन पर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने झाली. यावेळी चेतन काटे, प्रणाली खंडागळे, लखन डीसले, शुभांगी दडस, अर्पिता निचाळ, अमर सोळंके, केदार पवार आधी शिबिरार्थी स्वयंसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन डीसले प्रास्ताविक ऋतुजा वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मदन जाधव यांनी मानले. सदर शिबिर यशस्वीतेसाठी निरनिमगाव गावचे सरपंच प्रतापराव पाटील व त्यांचे सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी सागर सवासे, ग्रामपंचायत कर्मचारी शहाजी देवडे, अनंता पाटील, शेखर खरात, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री चामे सर श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील साहेब, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व संस्थेचे संचालक श्री उदयसिंह पाटील साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव किरणराव पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य डॉ.लहू वावरे, डॉ. तानाजी लोंढे, सुदर्शन गोळे व सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकेतर सेवक वृंद शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी व गावचे ग्रामस्थ यांनी अनमोल सहकार्य केले

