*भरतवाडी फाउंडेशनच्या वतीने अक्षय डोंगरे यांचा सत्कार*
इंदापूर: काटी गावातील अक्षय राजेंद्र डोंगरे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून वनरक्षक पदी निवड झाल्याबद्दल भरतवाडी फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. भारतवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस अधीक्षक दिनकर मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये व सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांच्या हस्ते अक्षयचा व वडील राजेंद्र डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला. काटी गावातून दरवर्षी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक मुले मुली चांगल्या पदावर यश मिळवत असतात. त्यांचे कौतुक करणे व इतरांना प्रोत्साहन मिळणे यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला जातो. फाउंडेशनचे अध्यक्ष दिनकर मोहिते यांनी अक्षयला शुभेच्छा दिल्या व पुढील अभ्यास सुरू ठेवून आणखी मोठ्या पदावर यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या व शिवाजी महाराजांचे कार्य उपस्थित लोकांसमोर मांडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांनीही फाउंडेशन राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले व यापुढे फाउंडेशन साठी सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे नियोजन फाउंडेशनचे खजिनदार संतोष मोहिते, प्रकाश राऊत, तुकाराम मोहिते, महादेव मोहिते ,राहुल मोहिते, मल्हारी शिंदे, शिवाजी राऊत, लखन परांडे, प्रकाश पडसळकर, विजय मोहिते, अंकुश मोहिते ,अतुल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनिल मोहिते यांनी केले.

