छ्त्रपती संभाजीनगर प्रतिनिधी:
छ्त्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पहिले ऐतिहासिक शिक्षक साहित्य संमेलन १० फेब्रुवारी २०२४ रोजी कांचनवाडी येथील अग्रसेन विद्या मंदिरात होणार आहे. या संमलेनात पैठण तालुक्याचे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक तथा बालभारतीच्या पाठ्य पुस्तकातील कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांना शिक्षक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सन्मानाने बोलविले आहे. कवी अय्युब पठाण हे निसर्गावर आधारीत " दान दे " ही नऊ अक्षरी कविता सादर करणार आहे.या कवि संमेलनात एकूण ५४ निमंत्रित कवी/ कवयित्रिची निवड झालेली असून त्यात त्यांचाही सहभाग राहणार आहे.
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

