श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोक इंग्लिश मिडीयम स्कूलने माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधित केलेली प्रगती व मिळविलेला नावलौकिक कौतुकास्पद आहे. स्कूलची प्रगती व परिसर पाहून आपण भारावून गेल्याचे प्रतिपादन निर्मळ किसान कनेक्टींग कंपनीचे सी.ई.ओ. किशोर निर्मळ यांनी केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक समारंभ अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे यांचे अध्यक्षतेखाली तसेच समन्वयक तथा अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री.निर्मळ यांनी शालेय परिसर व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीबाबत गौरवोदगार काढले. माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या संकल्पनेतून व सौ.मंजुश्री मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज हे तालुक्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. शाळेतील परिसर, नारळ, झाडी, बगीचा व मैदान पाहून आपणासआनंद झाला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळास महत्त्व द्यावे तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचे नावलौकीक करावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक भाषणात सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी स्कूल बाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना आधुनिक पध्दतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. यादृष्टीने आवश्यक अशा अद्ययावत सुविधा देण्यात येतात. स्कुलमध्ये डिजिटल क्लासरूम, संगणक लॅब, लँग्वेज लॅब, वाचनालय, प्रशस्त मैदान व क्रीडा साहित्य अशा सुविधा उपलब्ध आहेत. भविष्यात वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविल्याबद्दल बक्षीस वितरण करण्यात आले. प्राचार्य संपत देसाई यांनी स्वागत केले. यावेळी कोंडीराम उंडे, शाम पुरनाळे, मेजर लांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ॲग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन ॲन्ड डेव्हलपमेंट फौंडेशनचे अध्यक्ष सोपानराव राऊत, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, उत्तमराव डांगे, उद्धव आहेर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी -स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

