श्रीरामपूर प्रतिनिधी:
मानव सुरक्षा सेवा संघ ही समाजातील रांजले,गांजले, अन्यायग्रस्त,उपेक्षित आणि दुर्लक्षितांचे ज्वलंत प्रश्नांसाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत राष्ट्रीय सेवाभावी संघटना असुन या संघटनेच्या माध्यमातून समाजातील अन्यायग्रस्त रांजले - गांजले उपेक्षित, दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी आवाज उठविण्यात अग्रेसर असते व आहे.
या संघटनेत देशभरातील ज्येष्ठ विधीतज्ञ, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी,कर्मचारी, सेवानिवृत्त इंजिनीअर्स,महसूल अधिकारी, कर्मचारी,सेवानिवृत्त आरटीओ, अधिकारी,कर्मचारी, डॉक्टर्स, पत्रकार, शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते आदी कार्यरत आहेत.
संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे यांच्या नेतृत्वाखाली गेली सलग चार वर्षांपासून ही संघटना राज्यासह देशभरात कार्यरत आहे.
बशीरभाई भुरे यांनी या संघटनेचे कार्यक्षम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून सलग तीन वर्षांपासून ख्याती प्राप्त केलेली असल्याने त्यांच्या अशा या समाजाभिमुख कार्यास पाहता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे यांनी पुन्हा चौथ्यांदा त्यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
बशीर भाई भुरे यांनी महाराष्ट्र अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्या पासून राज्यभर दौरे करून शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा राज्यातील गोर- गरिब जनतेला फायदा मिळवून दिला आहे.
अन्यायग्रस्तांकरीता प्रत्यक्ष त्याठिकाणी पोहोचून परिस्थितीची सत्यता समजून घेता त्यांच्या न्याय- हक्कासाठी संघर्ष केला व करत आहे.
त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास मागे काही दिवसांपूर्वी सांगली येथील अब्दुलकलाम आझाद नगर मध्ये स्थानिक चार चार नगर सेवक असताना देखील तेथील समस्त नागरीक वीज, स्वच्छ पाणी, रस्ते, शौचालय,गटारी अशा मुलभूत सुविधांपासून अनेक वर्षे स्थानिक नागरिक वंचित होते, मात्र मानव सुरक्षा सेवा संघाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष बशीर भाई भुरे यांनी त्यांना मुलभूत सुवेधेप्रश्नी उचित न्याय मिळवून देण्यासाठी सांगलीत संघर्ष उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला, आज तेथील नागरिक बशीर भाई भुरे यांच्यासह मानव सुरक्षा सेवा संघाला अंतःकरणाने आशिर्वाद देत आहेत
असाच काहीसा प्रश्न नाशिक जिल्ह्याच्या मालेगांव शहरामध्ये देखील उपस्थित झाला असता येथील गटारे तुडुंब भरली होती, सर्वत्र प्रचंड दुर्गंधी पसरली होती.
स्थानिक नगरसेवक केवळ निवडणुकांपुर्तेच गल्ली - वॉर्डात दिसुन येत होती, मुलभूत नागरी समस्यांप्रश्नी त्यांना जणू काही घेणे -देणेच नव्हते.अशावेळी सदरील गंभीर परिस्थितीबाबत मालेगांव येथील मानव सुरक्षा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षांचा प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे यांना केवळ एक कॉल आल्यावर श्री. भुरे हे तात्काळ मालेगांवात दाखल होवून संबंधित मालेगांव महानगर प्रशासनाला जाब विचारुन परिसरात तुडुंब भरलेली गटारे त्वरित साफ करण्यास भाग पाडले.
याप्रमाणेच राहाता (शिर्डी) येथील इम्रान खाटिक यांचे वीज मीटर विनाकारण वीज वितरण कंपनीच्या काही कर्मचारी/अधिकाऱ्यांनी सक्तीने काढून नेले होते तथा त्यांना ४० हजार रुपयांचा दंड देखील आकारण्यात आला होता. मात्र तात्काळ बशीर भाई भुरे यांनी राहाता येथे जाऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून इरफान खाटीक यांचे वीज मीटर त्वरित पुन्हा बसवून इरफान खाटीक यांना उचित न्याय मिळवून दिला,
यासोबतच जनता आणी पोलिस यातील समज - गैरसमजातून काही वेळा निरपराधांना देखील पोलिसी त्रासाला सामोरे जाणे भाग पडते,त्या अनुषंगाने
महाराष्ट्र राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात श्री.भुरे हे स्वतः हजर राहून अथवा फोन कॉलद्वारे निरपराध जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना धीर देण्याचे कामे करत न्याय मिळवून दिला व देत आहेत.असे राज्यभरात एक ना अनेक कामे श्री.भुरे यांनी केल्याने व करीत असल्याने मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अमोल राखपसरे, राष्ट्रीय महासचिव भारत म्हसे आणी राष्ट्रीय कोअर कमेटीच्यावतीने रोहा (जि.रायगड) येथील तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते बशीर भाई भुरे यांची चौथ्यांदा शासनमान्य मानव सुरक्षा सेवा संघाच्या (हुमन राईट्स) या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे,
त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,ॲड.मोहसिन एस. शेख,पत्रकार उद्धव फंगाळ, शामराव काळपुंड,अजिजभाई शेख,अनिल कोळसे, अलताफ शेख, इम्रान पटेल, रमेश जेठे (सर), राजु मिर्जा, लियाकतखान पठाण, अफजल मेमन, इम्रान एस.शेख,अमोल शिरसाठ, असलम सय्यद, अमन सय्यद, शब्बीर शेख,जावेद शेख आदिंनी अभिनंदन केले आहे.
*पत्रकार राजु मिर्जा
(नाशिक विभाग: ब्यूरो चिफ)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

