अहमदनगर प्रतिनिधी:
येत्या २४ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती ही अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात येणार असल्याचे चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी सांगितले.
यासंदर्भात चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने रविवारी अहमदनगर मध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे होते.
यावेळी बोलताना श्री.साळवे म्हणाले की,संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रबोधनकार भारुड सम्राट मा. हमीदभाई सय्यद यांच्या भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
सोबतच सामाजिक, शैक्षणिक आदी विषयांकीत विविध सामाजाभिमुख उपक्रम सातत्याने वर्षभर राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे ते म्हणाले.
यावेळी चर्मकार संघर्ष समितीच्या भिंगार शहराध्यक्षपदी भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक रामकिसन साळवे आणि सचिव पदी सेवानिवृत्त सेल्स टॅक्स अधिकारी विठ्ठलराव जयकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच केडगांव उपनगराध्यक्षपदी भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक आश्रुजी लोकरे यांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्वांना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे आणि जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी मुख्य संघटक दिलीप शेंडे, उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे मेजर, मुख्य सल्लागार नंदकुमार गायकवाड. युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खरात, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जगताप,जिल्हा कार्याध्यक्ष रोहिदास उदमले,भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक लक्ष्मण साळे, संतोषराव त्रिंबके, दर्शन गायकवाड.तसेच महिला जिल्हाध्यक्ष सौ. मीनाताई गायकवाड, महिला शहराध्यक्षा सौ. शशिकलाताई झरेकर, सौ. संगीताताई साळवे, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. मंगलताई लोकरे, आदि मान्यवर उपस्थित होते.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

