shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जनता दरबार चा दणका*दिलीप परदेशी यांना मिळाला अपंगत्वाचा दाखला


श्री.दिलीप परदेशी यांना अपंगत्वाचा दाखला देताना शिवसेनेचे नेते संजय छल्लारे पत्रकार प्रकाश कुलथे तेजस बोरावके ,संजय साळवे ,सुधीर वायखिंडे सिद्धांत छल्लारे विशाल पापडीवाल प्रमोद गायकवाड अजय छल्लारे ,रोहित नाईक, बापू बुधेकर, विकी गंगवाल


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील गवंडी काम करणारे दिलीप बबनराव परदेशी यांना नुकताच अपंगतत्वाचा दाखला देण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिलीप बबनराव परदेशी हे गेल्या अनेक दिवसापासून अहमदनगर येथील  शासकीय रुग्णालयात संबंधित डॉक्टरांकडे चकरा मारत होते. परंतु त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. नुकताच श्रीरामपूर येथे शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते, या जनता दरबारामध्ये श्री. परदेशी यांनी विरोधी पक्ष नेते  अंबादास दानवे यांना झालेल्या सर्वषंषंँषह् प्रकाराबद्दल सविस्तर माहिती सांगून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी विनंती केली. सदर घटनेची अंबादास दानवे यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित विभागाचा अधिकाऱ्यांना फोन केला व या घटनेची सविस्तर चौकशी करून श्री परदेशी यांना त्वरित अपंगत्वाचा दाखला देण्यात यावा , अशी  सूचना केली. सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करत दिलीप परदेशी यांना त्वरित अपंगत्वाचा दाखला देण्यासाठी आदेश देण्यात आले.

श्री परदेशी यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे तालुकाप्रमुख लखन भगत राधाकिसन बोरकर, रमेश घुले, निखिल पवार श्रीरामपूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते संजय छल्लारे यांचे विशेष सहकार्य मिळाले. श्री परदेशी यांना नुकतेच पत्रकार प्रकाश कुलथे यांच्या शुभहस्ते हे सर्टिफिकेट देण्यात आले याप्रसंगी तेजस बोरावके संजय साळवे सुधीर वायखिंडे लक्ष्मणराव कुमावत सिद्धांत छल्लारे राजेंद्र बोरसे शरद गवारे बापू बुधेकर अजय छल्लारे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार राजु मिर्जा
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close