shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथे कृषी मित्रांकडून डिजिटल ॲप बद्दल माहिती.*

*बावडा येथे कृषी मित्रांकडून डिजिटल ॲप बद्दल माहिती.*
 
इंदापूर:महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना  डिजिटल ॲप बद्दल माहिती देण्यात आली.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. आर .जी. नलावडे प्रा. एस .एम .एकतपुरे ( कार्यक्रम समन्वयक),  प्रा.एम .एम .चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा. सौ एच .व्ही .कल्याणी (कार्यक्रम अधिकारी ) यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदुत जयश शिंदे, विश्वजीत आदमाने, श्रेयस कुलकर्णी, आकाश माने, मेघराज पाडूळे, आदित्य कवळसकर, नवनाथ इरकर यांनी उपस्थितांना डिजिटल ॲपची माहिती दिली. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना हवामान व पिक नियोजन संबंधी डिजिटल ॲप बद्दल माहिती दिली.
 *शेतकऱ्यांचा प्रतिसाद:-* 
कृषी मित्रांनी  फुले जल हा ॲप कसा डाऊनलोड करावा तसेच त्याचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून उत्तम प्रतिसाद दिला.
close