नेवासा प्रतिनिधी:
शिक्षण घेऊन केवळ पोटापाण्याची नोकरी करणारी पिढी नको तर समाजासमोर आदर्श दाखविणारी पिढी तयार होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सर्जन डॉ. रवीन्द्र कुटे यांनी व्यक्त केली.
इंग्लिश स्कूल नेवासा येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभात ते बोलत होते.
ही शाळा नावजलेली शाळा असून अनेक विद्यार्थ्याना त्यांनी घडवले आहे,अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत.शिक्षण घेताना परिश्रम, चिकाटी , एकाग्रता , सकारात्मकता , आत्मविश्वास ही गुण ग्राहकता मिळवावी त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा , खेळ , संगीत , वकृत्व , राष्ट्रीय सेवा योजना याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.
संशोधन हा शिक्षणाचा परिपाक असतो त्यामुळे उच्चशिक्षित तर व्हावेच परंतु नव्या पीढीने संशोधन कार्याकडे देखील बहू संख्येने वळले पाहीजे असे मार्गदर्शन केले.
मला या विद्यालयाचा अभिमान आहे, कारण या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे असेही ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपले मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड अलकाताई जंगले होत्या. मुख्याध्यापक बापू चव्हाण यांनी परीक्षेची माहिती दिली. पर्यवेक्षक पवार सर यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
*पत्रकार कमलेश शेवाळे (देवा)
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

