shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेती बापाचा धंदा आहे, पापाचा नाही शेतमाल विकायला लाजु नका - वाघ


पालघर प्रतिनिधी:
पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील  वाकडपाडा जलस्रोत समिती तर्फे आयोजित शेतकरी व महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती  प्रदीप वाघ यांनी सांगितले की नाबार्ड व बायफ संस्था च्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत झालेल्या दगडी बांध,चरी खोदकाम कामांमुळे पाणी पातळीत वाढ होईल, शेतकरी बांधवांनी योजनांचा लाभ घेऊन शेती समृद्ध करावी, तसेच शेती करायला तरुणांनी पुढे यावे, पिकवलेला माल बाजारपेठेत विक्री करायला लाजु नये, कारण शेती हा बापाचा धंदा आहे पापाचा नाही करीता शेतमाल विकायला लाजू नये,महिला बचतगट माध्यमातून महिलांनाही आर्थिक उन्नती करावी असे प्रतिपादन प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.

नाबार्ड पुरस्कृत बायफ व उधळे वाकडपाडा जलस्रोत समिती तर्क या कार्यक्रमाला प्रदीप वाघ उपसभापती, कुसुम झोले जिल्हा परिषद सदस्य , नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री मिलिंद झोले, निलेश झुगरे,बायफ संस्थेचे प्रशांत बोराडे, एकनाथ कानवडे, अनिल पालवे, दिनेश महाले, भावेश राठोड,नजन दिपक, बँक शाखाधिकारी  कोमल निकम, कृषी सहायक मिटकरी,समिती चे सदस्य यशोदा बेंडकोळी, परशुराम गवारी, ग्रामपंचायत सदस्य गणेश खादे आदि उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती चे अध्यक्ष  संजय वाघ यांनी केले.

*पत्रकार सौरभ कामडी- पालघर
*सहयोगी
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close