shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सौ.स्वाती सुरेश लोंढे व सुरेश गोरख लोंढे यांना केले सन्मानित .

उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सौ.स्वाती सुरेश लोंढे व सुरेश गोरख लोंढे यांना केले सन्मानित .
इंदापूर: - "नवी दिशा नवे उपक्रम" या राज्यस्तरीय समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा २०२४  दि. ९ मार्च २०२४ रोजी राजीव गांधी ई- लर्निंग स्कूल सहकारनगर, पुणे येथे पार पडला. 
या सोहळ्यामध्ये शंभर उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले.. तसेच त्यांनी सादर केलेल्या विविध नवोपक्रमांच्या " शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे" या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले. 

याप्रसंगी इंदापूर तालुक्यातील जि.प. प्राथ. शाळा ,अभंगवस्तीच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.स्वाती सुरेश लोंढे यांना तसेच जि. प. प्राथ.शाळा इंदापूर नं.६ येथील उपक्रमशील शिक्षक श्री. सुरेश गोरख लोंढे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
या दोन्ही शिक्षकांचे उपक्रम या पुस्तकात समाविष्ट आहेत. या कार्यक्रमास  शुभांगी चव्हाण- उपशासकीय अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपा या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच SCERTचे अध्यक्ष राहुल रेखावार साहेब, सहसंचालक मा. डॉ .शोभा खंदारे मॅडम आणि श्री. माणिक देवकर साहेब- क्रीडा विभाग प्रमुख शिक्षण विभाग पुणे मनपा हे उपस्थित होते. श्री. देवराव चव्हाण सर, श्री बळीराम जाधव सर आणि श्री आयुब शेख सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
close