shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला दिनानिमित्त लिनेस क्लब ऑफ शहा गावच्या वतीने कर्तुत्ववान व कष्टकरी महिलांचा सन्मान...

महिला दिनानिमित्त लिनेस क्लब ऑफ शहा गावच्या वतीने कर्तुत्ववान व कष्टकरी  महिलांचा सन्मान...
इंदापूर:- मौजे शहा ता .इंदापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कष्टकरी महिलांचा शाल,साडी व संसार उपयोगी साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट डॉ.जयश्रीताई गटकुळ ,लिनेस क्लब इंदापूरच्या अध्यक्षा उज्वला  गायकवाड, डिस्ट्रिक्ट केबिनेट ऑफिसर रतनताई पाडुळे, महिला दक्षता समिती सदस्या निलोफर पठाण व निर्मलाताई जाधव, मंजिरी लावंड ,अर्चना शिंदे, सुनंदा अरगडे, संगिता  चौधरी या कर्तुत्वान पदाधिकाऱ्यांच्या देखील सन्मान करण्यात आला.
यापूर्वी शहा लिनेस क्लबला  गरजु लोकांना कपडे वाटप, अनाथाश्रमातील मुलांना साहित्य वाटप , महिला सक्षमीकरण अशा अनेक चांगल्या समाजोपयोगी कामाबद्दल जिल्ह्यास्तरिय 3 व आंतरराष्ट्रीय पातळीवर 1 असे अवॉर्ड मिळाले आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी, होतकरू महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लिनेस क्लब शहाच्या  अध्यक्षा जयश्रीताई खबाले यांनी सांगितले.सदर कार्यक्रमास लिनेस क्लब शहाच्या सचिव योगिता चोपडे, खजिनदार प्रियांका जाधव. मनिषा पाडुळे, सुनिता पाडुळे, वैशाली जाधव उपस्थित होत्या.
close