श्रीरामपूर प्रतिनिधी:
शनिवार दि. १६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वा. द पॅशन ऑफ द खाईस्ट (प्रभु येशू ख्रिस्ताचे दुःख सहन) या आध्यात्मिक तसेच धार्मिक महापथनाट्य हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. उपवासकाळ हा ख्रिस्त बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. या काळामध्ये प्रार्थना, दानधर्म या आध्यात्मिककडे वाटचाल ख्रिस्त बांधव करीत असतात आपल्या श्रध्देला ते बळकटी आणत असतात, ख्रिस्त बांधवांच्या श्रध्देत आणखी भर पडावे प्रभु ख्रिस्ताचे दुःख पाहून त्यांच्या अंतकरणात दया, क्षमा, शांती प्रेरित व्हावी व प्रभु येशू ख्रिस्ताच्या मार्गाने चालण्यासाठी सगळ्यांना सामर्थ्य मिळावे या उद्देशाने लोयोला सदन चर्च, जनसेवक रितेश एडके, सामाजिक कार्यकर्ते सुहासभाऊ राठोड यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार दि. १६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वा. सेंट झेवियर हायस्कूलच्या ग्राऊंडवर श्रीरामपूर येथे प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखावरती प्रकाश टाकणारे व ख्रिस्ती बांधवाच्या श्रध्देत वाढ करणारे ६५ कलाकारांचा समुह असणारे महापथनाट्य होणार आहे.
तरी कार्यक्रमाचा सर्व बांधवांनी लाभ घ्यावा व ख्रिस्ती जीवन अधिक उत्तमपणे जाणून घ्यावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते सुहासभाऊ राठोड व जनसेवक रितेश एडके, लोयोला सदन चर्च यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे.
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111