shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लक्ष्यवेध स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पाटोळे आणि पागिरे यांचे सुयश


श्रीरामपूर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्यातील तज्ञ तंत्रस्नेही शिक्षकांच्या पुढाकाराने इयत्ता पहिली ते आठवीसाठी लक्ष्यवेध प्रज्ञाशोध स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये येथील डी.डी.काचोळे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी पागिरे ओम संदीप व पाटोळे आयुष बाळासाहेब या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकावला. 


या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले. रयत चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्रीमती मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश पाटील निकम , मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व सेवक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

*पत्रकार राजू मिर्जा
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन* 
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close