shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुस्ती क्षेत्रातले असलेले सम्राट, गुरु शिष्यांना उमेदवारी दिलेला शब्द टाळला

अहिल्यानगर:-
अहिल्या नगर जिल्ह्याचे पहिले महाराष्ट्र केसरी व राष्ट्रीय खेळाडू पैलवान पानसरे सीबी यांना वंचित बहुजन आघाडीने दोन्ही पैलवानांना टाळलं 
पैलवान पानसरे सीबी यांनी स्पष्ट केले की गुलाबर्डे माझे कुस्तीतले गुरु आहेत .कालच राहुरी या ठिकाणी कुस्तीच्या आखाड्यामध्ये गुलाबर्डे हे दिंडोरी मतदार संघातून उमेदवारी करणार हे जाहीर झालं. तसेच पैलवान पानसरे मजली चिंचोलीकर (आव्हावाडी)अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढवणार हे डिक्लेअर झालं पण पुन्हा रात्रीतून चित्र पालटलं गेले .या ठिकाणी फक्त पैशावाल्यांनाच उमेदवारी दिली जाते हे स्पष्ट झालं.

दोन्ही उमेदवारांनी अनेक ठिकाणी महाराष्ट्राचे मैदान गाजवलेली आहेत .कुठल्याही मैदानातून पळ काढलेला नाही .कुस्ती काटाच केलेली आहे .अजूनही दोन्ही पैलवान मैदानामध्ये दंड ठोकतात त्याचपद्धतीने तेवढाच प्रॅक्टिस आहे.तेवढाच खुराक त्यांचा चालू आहे .परंतु दोन्हीही पैलवानांना उमेदवारी देण्याचं वरिष्ठ उमेदवारांनी टाळलं. आणिक दिवसापूर्वी दोघांना उमेदवारी मिळणार असं वंचित आघाडी कडून विचार मंथन चालू होतं. दोन्ही उमेदवार पूर्णपणे मतदारसंघाच्या संपर्कात होते व वाड्या वस्त्यावर जाऊन सर्वांच्या भेटी घेत होते. कुस्त्याच्या निमित्ताने एका एका गावात कमीत कमी दहा दहा वेळा त्यांचे जाण झाल्यामुळे जनमानसाशी संपर्क झालेला आहे. त्यांना सर्वजण ओळखतात. जनतेच्या संपर्कात असल्यामुळे जनतेचे दुःखही त्यांना माहिती आहे. परंतु अचानक निर्णय बदलल्यामुळे सर्व कुस्तीपटूमध्ये चर्चेचा विषय झालेला आहे.दोन्ही गुरु शिष्य नाराज झालेली आहेत. सदर घटनेमुळे कुस्ती व अनेक नवतरुण कुस्ती पैलवान मध्ये एक दुःखाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आता हे गुरु शिष्य अपक्ष लढवतील का असाही प्रश्न होत आहे.
close