shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडाळा महादेव येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान यात्रा उत्सव संपन्न..



श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील जागृत पुरातन शिवकालीन श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी सालाबादप्रमाणे महावीर जयंती दिनी यात्रा उत्सव संपन्न झाले.
 
सकाळी सहा वाजता श्री क्षेत्र पुणतांबा तसेच भामाठाण येथुन  गंगाजल आणणाऱ्या भाविक भक्तांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन यानंतर आणलेल्या गंगाजलाने मंदिरामध्ये जलाभिषेक करण्यात आले. आरती मंडळ तसेच भाविक भक्त यात्रा उत्सव समिती यांच्याकडून विधीवत पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन तसेच नवसपूर्ती करणार्यांनी दिवसभर शेरणी पेढे वाटप केले. सायंकाळी ७ वा ब्रह्म विष्णू महेश या त्रिलिंगी देवतांची रथामधून मिरवणूक काढण्यात आली. तसेच पार्वती स्वरूप काठीची माळी समाज बांधवांच्या वतीने रथा बरोबर गावामधून मिरवणूक काढण्यात आली.येथे रथ ओढण्याचा मान वडार समाज बांधवांना आहे. 

 यानंतर महादेव देवस्थान येथे फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी सकाळी बहुरूपी कलाकार यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. दुपारी मंदिर परिसरामध्ये कुस्तीगीर यांनी आपली कला प्रदर्शित केली. अनेक कुस्तीगीरांचा सन्मान करण्यात आला.  याच ठिकाणी हनुमान मंदिर आहे. हनुमान जयंती उत्सवानिमित्त सकाळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यात्रा कमेटीने चोख व्यवस्था केल्यामुळे कार्यक्रमाची सांगता हर्षोल्लासात झाली.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close