shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सुनेत्रा अजित पवार यांना बारामती तालुक्यापेक्षा सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य देणार - हर्षवर्धन पाटील.

सुनेत्रा अजित पवार यांना बारामती तालुक्यापेक्षा सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये  सर्वाधिक मताधिक्य देणार - हर्षवर्धन पाटील.
फोटो ओळ: वडापुरी( ता. इंदापूर )येथे भाजप नेते राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील वडापुरी गणातील भाजप कार्यकर्त्या बरोबर संवाद दौरा प्रसंगी आयोजित बैठकीत बोलताना

इंदापूर: आता आपण शब्द दिला आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना बारामती तालुक्यापेक्षा सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये  सर्वाधिक मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे चालायचे आहे. म्हणून आपलं बुत, आपलं गाव कोणी सोडून नका असे आवाहन भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वडापुरी (ता. इंदापूर ) येथे आयोजित वडापुरी गणातील भाजप कार्यकर्ता संवाद दौऱ्या बैठकी प्रसंगी बोलताना  केले .

 याप्रसंगी  अंकिता पाटील ठाकरे, शरद जामदार, उदयसिंह पाटील, तुषार खराडे, सुनील लवटे, बबलू पठाण यांनी आपली मनोगत व्यक्त केली. तर प्रस्ताविक बापु चंदनशिवे यांनी केले.

यावेळी  सभापती विलास वाघमोडे,   सुरेश मेहर, सुभाष काळे ,आबासाहेब शिंगाडे, दादासाहेब घोगरे ,तुषार खराडे, वैभव बोराटे, गोपीचंद गलांडे, विष्णू मोरे, वामन  सरडे ,विजय देवकर, नामदेव ताटे, किसन भांगे, अजित खबाले, दगडू सिद ,भास्कर गुरगुडे, अमोल इंगळे, रमेश देवकर,  मयूर शिंदे ,सोमनाथ पिंपरी, अंकुश जाधव, नारायण नलावडे, दत्तात्रय शिर्के ,सिद्धेश्वर खराडे, हेमंत थोरात, तुषार थोरात, रामभाऊ , परमेश्वर देवकर, सचिन कांबळे ,प्रतापराव बागल, प्रीतम देवकर, धनंजय फडतरे ,महेश शिर्के ,संतोष देशमुख ,राजेंद्र पाटील ,तानाजी पिंगळे, उत्तम उंबरे, विठ्ठल कदम ,दिगंबर आरडे,  दिनेश शिंदे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की,   नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा
 पंतप्रधान करायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी १३५ कोटी लोकांची गॅरंटी घेतली आहे.  संविधानाचे रक्षण करू संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने या देशातील सगळ्या समाजाला योग्य न्याय व देश  सुरक्षित ठेवू . देशातील गरिबी  दूर करून दारिद्र रेषेखालील २५ कोटी कुटुंब दारद्री रेषेच्या वरती अणू ,मोफत धान्य , शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण,  शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राचे सहा व राज्याचे सहा  रुपये असे १२ हजार रुपये , पाच हजार रुपये पर्यंत विम्याचे संरक्षण , उज्वला गॅस योजना , अशा कितीतरी जनकल्याण योजना या मोदी यांनी गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये केलेले आहे म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान निवडून देणे हे या निवडणुकीतील महत्त्वाचा भाग असल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच तुमच्याकडे कोण जर विरोधी पार्टीचे आले तर त्यांना चहा नाश्ता जेवण द्या पण त्यांना एकच सांगा की, मताच सोडून तुम्हाला जे काय बोलायचे ते बोला.ही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. या संवाद दौऱ्या नंतर जिल्हा परिषद व वाड्या वस्ती वरती घोंगडी बैठक होतील, दोन तारखेपासून पुढे संयुक्त सभा होतील. अशा पद्धतीने पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकी संदर्भात ठोस भूमिका घेण्याच्या आवाहन केले. 

------------------------------
यावेळी हर्षवर्धन पाटील विविध प्रश्नावरती  बोलताना म्हणाले की, ५९ फटाचा, ५७ फटा पाणी चालू आहे, काही ठिकाणी पाणी येत नाही. लाईटचा प्रश्न गंभीर आहे. भीमा नदी, नीरा नदी मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. उजनी धरणामध्ये पाणी  ३० टक्के मायनस मध्ये आहे. खडकवासल्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. बऱ्याच गावामध्ये टँकरची मागणी आता सुरू झाली आहे. आता हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील .तसेच वडापुरीच्या श्रीनाथ मंदिराच्या मंडपासाठी आदर्श आचारसंहिता लागण्यापूर्वीच पंधरा लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यासंदर्भातचे मंजुरीचे पत्र हे आपल्याकडे असून हे काम चांगल्या पद्धतीने करावे असेही यावेळी त्यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र विकास आराखडातून श्रीनाथ मंदिर विकास कामे कसे करता येईल ते आपण पाहू. सध्या चालू असलेल्या पालखी महामार्ग मध्ये गावामध्ये एका अंतर्गत बोगद्याची गरज असून ते सर्व भविष्य काळामध्ये आपल्याला करायचे आहे. इंदापूर तालुक्याचे राजकारण चार गोष्टी वरती चालतंय त्यामध्ये प्रमुख्याने पाणी. वीज, बँक भांडवल, शेती उद्योग व्यवसाय या संदर्भातही प्रश्न लवकरच सोडवले जातील.
----------------------------------------
.
close