shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सौ.अनिता पवार या राष्ट्रीय मानव अधिकार व सामाजिक न्याय आयोगद्वारे सन्मानित

पुणे (वाघोली) प्रतिनिधी:
राष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय आयोग द्वारे २०२४ साठी समाजातील वंचित घटकाकरिता सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून भूमी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेकडो विधवा निराधार महिला इत्यादींना मोफत शेळी वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम आणी शेतकऱ्यांच्या निराधार गरजू मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन व मदत सातत्याने करणाऱ्या अनिता कैलास पवार यांना यावर्षीचा हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे असे आयोगाचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट अखिलेश चौधरी यांनी सांगितले. 

यावेळी मला मिळालेला सन्मान हा पुढे अजून खूप चांगलं काम करण्यास प्रेरणा देत राहील असे अनिता कैलास पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अनिता पवार ह्या भूमी फाउंडेशन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या त्या पत्नी आहेत.भूमी फाउंडेशन ही सामाजिक संस्था असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन राज्य पातळीवर काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून त्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य स्थानी आहे असे मत आयोगाचे राजन खेडेकर यांनी दिले.या निवडी संदर्भात भूमी फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले. त्याचबरोबर परिवारातील सदस्य आणि नाते अपेष्ट स्तरावर त्यांचे अभिनंदन होत आहे.


स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close