shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिवाजीराव साळवे, बहुजनांचे आधारवड; विवाह वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छांचा वर्षाव

अहमदनगर प्रतिनिधी:
येथील चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) या संस्थेतचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे  आणी सौ.वहिनी साहेब यांना त्यांच्या विवाह वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

शिवाजीराव साळवे हे गरीब कुटुंबातून पुढे आले आहेत. ग्रामीण भागात त्यावेळी  शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या, अशा परिस्थितीत त्यांनी आई- वडिलांच्या इच्छेमुळे अनेक संकटावर मात करत शिक्षण सुरू ठेवले.आतापर्यंतच्या जीवनात त्यांना अनेक चांगले, वाईट अनुभव आले.आजही ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात समाजासाठी निस्वार्थपणे सेवा करत आहेत.महाराष्ट्र राज्यांमधील कोणत्याही बहुजन समाजाचा प्रश्न असेल तर त्यासाठी ते स्वतः सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात,संपूर्ण राज्यात शिवाजीराव साळवे या नावाचा आपल्या कर्तुत्वाने एक वेगळाच ठसा जनमानसात त्यांनी निर्माण केला आहे. संघटनेत काम करत असताना तळागाळातील लोकांपर्यंत, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी , शिक्षण,आरोग्य आणि समाजा च्या आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे समाजाला मार्गदर्शन करत असतात. चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र च्या रूपाने त्यांनी महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्त्यांची एक अभ्यासू,विश्वासू आणि उत्कृष्ट अशी फळी निर्माण केली आहे . आजच्या परिस्थितीत समाजासाठी तन,मन,धनाने झटणारा असा एक वेगळा आदर्श सामाजिक कार्यकर्ता समाजामध्ये मिळणे मोठे मुश्कील आहे. 


शिवाजीराव साळवे यांनी केवळ चर्मकार समाजासाठी नव्हेच तर सर्व बहुजन समाजासाठी आपला वेळ दिलेला आहे.बहुजन समाजाच्या विकासासाठी ,त्यांच्या अडचणीसाठी सोडविण्याकामी ते कधीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात,तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यांना मोलाची साथ देणाऱ्या फातिमाबी शेख  अशा अनेक महापुरुषांच्या विचाराने प्रभावित होऊन,आपले कुटुंब, नोकरी सांभाळून, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला समाज अशा पद्धतीने त्यांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले आहे. शिवाजीराव साळवे म्हणजे एक घनघाट सावलीचे मोठे वटवृक्षच म्हटल्यास वावगे ठरु नये असे श्री.साळवे साहेबांचे अजोड कार्य आहे. त्यांनी कधीच कोणत्याही गोष्टीच लोभ धरला नाही.कधीही मोठेपणा मिरवला नाही,समाजाने शिकावे ,मोठे व्हावे, व्यवसायामध्ये आपले नाव कमवावे, ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजासाठी आपण काहीतरी चांगले केले पाहिजे. एकमेकांच्या अडचणी सोडविण्यासाठी एकत्र आलो पाहिजे.संघटन ही एक अशी ताकद आहे की, जे एकत्र आल्याने बऱ्याचशा समस्या या आपोआप सुटतात.तेव्हा समाजाने भविष्यात एकत्र रहावे असे विचार ते आपल्या नेहमीच्या सामाजाभिमूख उपक्रमांच्या विविध कार्यक्रमात बहुजन समाजाला सतत देत असतात. अशा या विविध सामाजाभिक उपक्रम आणी आपल्या प्रामाणिकपणा तथा कर्तुत्वामुळे ते समाजाण एक भूषण ठरले आहे. उच्च विचार सरणी, साधी राहणीमान,अभ्यासपूर्ण मांडणी, समाजाविषयी तळमळ, अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आणि रोखठोक विचार मांडण्याची शक्ती यामुळे शिवाजीराव साळवे समाजाचे,बहुजनांच्या ह्रदयातील ताईत बनले आहे. त्यांनी कधी भपकेपणाला महत्त्व दिले नाही . संघटनेमधील सर्व सदस्यांना, कार्यकर्त्यांना महापुरुषांच्या विचाराने प्रेरित करण्याचे कार्य सतत करत असतात.आतापर्यंत त्यांनी समाजासाठी ,महिलांसाठी विविध उपक्रम ,विविध मेळावे घेऊन समाज जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व महापुरुषांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.त्या उपकाराची आपण जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तेच आपल्याला तारू शकते.असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे व करत आहे.या सर्व सामाजिक कार्यात त्यांच्या सौभाग्यवती तथा आमच्या भगिनी सौ. संगीताताई साळवे यांचेही श्री.साळवे साहेबांना नेहमीच मोलाचे सहकार्य असते .त्यांच्या सहकार्यानेच श्री.साळवे साहेबांना बहुजन समाजासाठी काम करण्याची ऊर्जा मिळत असते. आज बहुजनांचा हिरा म्हणून  
त्यांच्याकडे पाहिले जाते.शांत, संयमी, समजून घेणे आणि आलेल्या अडचणीवर योग्य प्रकारे मात करणे हे साहेबांचे खास वैशिष्ट्य आहे .समाजामध्ये अनेक संघटना समाजासाठी काम करतात परंतु समाजाचे हित कशात आहे, समाजाला नेमकं काय पाहिजे, समाजाची स्थिती कशी सुधारते,समाजाच्या पुढच्या पिढीला कोणते मार्गदर्शन पाहिजे  याचा अभ्यास करून समाजाच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे मार्गदर्शन श्री.साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे वतीने विविध उपक्रमांद्वारे राबवले जातात.
श्री.साळवे साहेबांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे एक विचारवादी संघटन असावं, समाजाला चांगली दिशा मिळावी, सर्व बहुजन एकत्र आनंदाने राहुन आपला विकास होण्यासाठी एकमेकांना साथ देतील असं संघटन हवे म्हणून त्यांनी चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या वतीने बहुजनांना न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. असा असाधारण, असामान्य समाजाच्या हितासाठी झटणारा एक अवलियाच आहे .आज त्यांच्या लग्नाचा विवाह वाढदिवसाच्या निमित्ताने श्री. शिवाजीराव साळवे साहेब,तथा आमच्या भगिनी सौ. संगीताताई साळवे यांना खूप खूप शुभेच्छा. समाजाच्या कृपेने त्यांना समाजाचे काम करण्याची  उज्वल संधी मिळो.त्यांना चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा. त्यांच्या विवाह वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांना सुभाष भागवत (प्रदेशाध्यक्ष), बाबासाहेब तेलोरे 
(राज्य उपाध्यक्ष), गोकुळदास साळवे (राज्य प्रसिद्धीप्रमुख), बाळकृष्ण जगताप (अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), बाबासाहेब लोहकरे (जिल्हाध्यक्ष अहमदनगर दक्षिण),संजय दळवी (जिल्हाध्यक्ष उत्तर अहमदनगर), अभिजीत खरात (युवक जिल्हाध्यक्ष अहमदनगर), सौ. सुनंदा शेंडे (उत्तर जिल्हाध्यक्ष अहमदनगर), सौ.मीनाताई गायकवाड (दक्षिण जिल्हाध्यक्ष अहमदनगर), अभिजीत शिंदे (राज्य उपाध्यक्ष), नंदकुमार गायकवाड (राज्य सल्लागार), दिलीप शेंडे (जिल्हा संघटक अहमदनगर), बापुसाहेब देवरे (वधु - वर सुचक मंडळ जिल्हाध्यक्ष), सौ.चंद्रकला गायकवाड (राहाता तालुका अध्यक्षा), सौ.शशिकलाताई झरेकर (शहराध्यक्षा अहमदनगर शहर), अश्रुजी लोकरे, सौ.धस मॅडम (डिजिटल राज्य प्रसिद्धी प्रमुख),शौकतभाई शेख (अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), रामकिसन साळवे,विठ्ठल जयकर,पोपटराव बोरुडे, बाळासाहेब केदारे,सुरेश शेंडे (तालुकाध्यक्ष नेवासा), तथा चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी यांच्या तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या असुन विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

*शब्दांकन
*@ दिलीप कारभारी शेंडे (सर)*
चर्मकार संघर्ष समिती, जिल्हा
 संघटक अहमदनगर जिल्हा.

*पत्रकार सौ.सुनंदाताई शेंडे
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close