सद्गुरु नारायणगिरीजी महाराज अरुणनाथगिरी महाराज मो नं.9921773005 यांच्या मार्गदर्शनाने श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर.भामाठाण.ता.श्रीरामपूर.जि.अहमदनगर.या ठिकाणी सालाबाद प्रमाणे या ही वर्षी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्काराला अत्यंत महत्त्व आहे. आपण पाल्यास शालेय शिक्षण देतो पण फक्त शालेय शिक्षणाने जीवन पूर्ण होऊ शकत नाही.तर त्याबरोबर अध्यात्मिक शिक्षणाची व संस्काराची ही गरज आहे.शालेय शिक्षण घेतल्यानंतर संपत्ती कमवू शकतो.परंतु त्या संपत्तीचा विनियोग चांगल्या प्रकारे कसा करावा तसेच आपले आई वडील.शिक्षक.इष्ट.मित्र.स्वजन सखे.वडीलधारे माणसं यांचा आदर कसा करावा.ते संस्कार बालसंस्कार शिबिरात व गुरुकुलामध्ये दीले जातात. अनादी काळापासून ऋषीमुनींनी चालू केलेली ही परंपरा आहे. तीच परंपरा अडबंगनाथ संस्थान भामानगर.भामाठाण.या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे.ज्या पवित्र पावन भूमीमध्ये प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांच्या अश्रूंनी तयार झालेली शीळा आहे. त्याच शिळेवर अडबंगनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केलेली आहे.अशा पवित्र भूमीचा अत्यंत अल्पशा काळामध्ये स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी काया पालट केलेला आहे .त्या ठिकाणी विविध प्रकारचे वेगळे वेगळे उपक्रम राबवून प्रबोधनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून अत्यंत चांगले उपक्रम अडबंगनाथ संस्थानच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवण्याच काम चालू केलेल आहे.म्हणून दरवर्षी *बालसंस्कार शिबिर* हे होत असतं या वर्षी *गुरुवार.दि.9.05.2024* रोजी बालसंस्कार शिबिराला प्रारंभ होणार आहे तरी आपण आपल्या मुला मुलीला नक्कीच पाठवावे आणि त्याचा लाभ घ्यावा.नाव नोंदणी चालू आहे संस्थानशी संपर्क साधून त्वरित नाव नोंदणी करावी.
शिबिराची सांगता बुद्ध पौर्णिमे निमित्त 23.05.2024 रोजी स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल व त्यानंतर संदीप रमेश पारखे पुणे व सज्जन मारुती पारखे नाशिक यांच्या वतीनं महाप्रसाद होईल.
🚩🚩 *गुरुकुल प्रवेश* 🚩🚩
*गुरुवार दि.01.06.2024 पासून अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी शालेय शिक्षण आणि गुरुकुलातील शिक्षणाला प्रारंभ होणार आहे.गुरुकुलात
1.किर्तन.
2.प्रवचन.
3.मृदुंग.
4.तबला.
5.हरिपाठ.
6.पावल्या.
7.गीता.
8.नवनाथ कथा.
9.रामायण कथा.
10.भागवत कथा.
11. ज्ञानेश्वरी.
12.अडबंगनाथ गाथा.
13.अडबंगनाथ मनका.
हे विषय शिकवले जाणार आहे.तरी आपण संस्थानशी संपर्क साधून नाव नोंदणी करून घ्यावी आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
अशा पवित्र पावन भूमीमध्ये ज्या भाविकांना अन्नदान.वस्त्रदान.वही.पुस्तक.गीता.अशा काही स्वरूपात दान करण्याची इच्छा असेल तर त्याही करता आपण मदत करू शकतात.
टीप.9 मे 2024ते 23 मे 2024 या कालावधीमध्ये आपण नक्कीच भव्य बालसंस्कार शिबिराला भेट द्यावी.तसेच ही माहिती वाचून झाल्यानंतर पुढे शेअर करावी.ही नम्र विनंती.🙏🙏
*विद्यार्थी नाव नोंदणीसाठी संपर्क*
*ज्ञानेश्वर महाराज काकडे.7588605305*
*लखनगिरी महाराज. 7020902470*
*फोन पे गुगल पे नंबर.9921773005*

