shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विद्यार्थी सर्वागीण विकासाचे केंद्र म्हणजे जिल्हा परिषद शाळा : गटविकास अधिकारी सचिन खुडे *

*विद्यार्थी सर्वागीण विकासाचे केंद्र म्हणजे जिल्हा परिषद शाळा : गटविकास अधिकारी सचिन खुडे *
         *प्रशासनात केंद्र प्रमुख पदाचे स्थान अनमोल आहे--- गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात .
  इंदापूर :- आज दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी श्रीसंत मुक्ताबाईच्या पावन भुमित शेळगाव केंद्राचे आदर्श केंद्र प्रमुख श्री मारुती सुपुते  यांचा सेवा पुर्ती समारंभ संपन्न झाला .प्रथम शेळगाव केंद्रातील सर्व महिलांनी छान रांगोळी काढून , त्या नंतर सर्व शिक्षकांच्या सहकार्याने मा. सुपुते साहेबांचे हलगीच्या नादात , गुलाब पुष्प टाकुन कार्यक्रमस्थळी स्वागत करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाले.त्यानंतर साहेबांचा फुल पोशाख व सोन्याची अंगठी देऊन केंद्रातील शिक्षकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक  श्री.प्रताप शिरसट सर यांनी केले.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन इंदापुर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सन्माननीय सचिनजी खुडे  उपस्थित होते.आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की , जिल्हा परिषदेचा विद्यार्थी कधीच वाया जात नाही,तो काहीना काही करून आपले घर तर चालवतोच पण आपले  कुटुंब पण एकसंध ठेवण्यासाठी सतत प्रयत्न शील  असतो. एक सु संस्कारी  नागरिक घडवण्याचे काम जिल्हा परिषद शाळा करतात.त्यामुळे जिल्हा परिषद शाळा  मुलांचा सर्वागीण विकास घडवण्याची केंद्रबिंदू ठरत आहे .नक्कीच मला माझ्या जिल्हा परिषद शिक्षकांचा अभिमान वाटतो. घडणारे  उच्च पदस्थ अधिकारी  हे पण जिल्हा परिषद शाळेत शिकलेले विद्यार्थी असतात.
         या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सन्माननीय खरात साहेब आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,जिल्हा परिषदेचा केंद्रप्रमुख  हा अधिकारी शिक्षकांना कधी न दुखवता त्यांच्याकडून  प्रशासकीय कामे करून घेताना त्याच्या शाळेचा दर्जा कसा  वाढत राहील याकडे ही तेवढ्याच जाणीवपूर्वक लक्ष देत राहतो. त्यामुळे आज इंदापूर मध्ये विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मुलांचे यश दिसून येत आहे.त्यामुळे केंद्रप्रमुख पद हे प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे.
           या वेळी विस्तार अधिकारी खळदकर साहेब , सेवापुर्ती केंद्र प्रमुख मारुती सुपुते साहेब ,केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेब ,केंद्रप्रमुख भिवा हगारे साहेब ,  हेळकर साहेब , भोईटे सर ,नानासाहेब नरुटे सर ,सतीश दराडे सर ,अनिल जाधव सर संतोष वाघ सर  यांनी मनोगते व्यक्त केली.
    या वेळी उपस्थित सर्व शिक्षक बंधु भगिनी व ग्रामस्थ, अधिकारी यांच्या भोजनाची सोय करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन शेळगाव केंद्रातील सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले त्या बद्दल सर्व शिक्षकांचे विशेष आभार मानले.
या सेवापुर्ती गौरव समारंभास साहेबराव शिंगाडे,  रामदास शिंगाडे,भागवत  भुजबळ, मोहन दुधाळ,.राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, मोहन खराडे,  सोपान माने,  विलास भांगे, गिरीष सर ,शुभम शिंगाडे, महेश खराडे, विठ्ठल ननवरे , सोमनाथ सुपुते, पोलिस पाटील संतोष शिंगाडे, किरण माने, प्राचार्य संदीप जाधव, गणपत खोमणे गुरुजी  तसेच या वेळी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तालुका सोसायटीचे संचालक माजी संचालक जिल्हा सोसायटीचे संचालक माजी संचालक व इतर केंद्रातील निमसाखर ,निमगाव,व्याहाळी,इंदापुर ,काटी अंथुर्णे ,न्हावी ,वरकुटे बु केंद्रातुन मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थितीत होते इतर आदी मान्यवर ,ग्रामस्थ उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम मोहिते सर  यांनी तर आभार नितीन मिसाळ सर  यांनी मानले.
close