shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राज्यस्तरीय ग्रापलिंग स्पर्धेत अनंत स्पोर्ट्स अकॅडमी, उंबरे चा बोलबाला ; ६ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
बुधवार दिनांक २४ एप्रिल २०२४


राज्यस्तरीय ग्रापलिंग स्पर्धेत अनंत स्पोर्ट्स अकॅडमी, उंबरे चा बोलबाला ; ६ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड..!!
राहुरी  : राज्यस्तरीय ग्रापलिंग स्पर्धेत अनंत स्पोर्ट्स अकॅडमी, उंबरे चा बोलबाला ; ६ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ग्रापलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित "अठराव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय ग्रापलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन दिनांक 16 व 17 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर येथे करण्यात आले होते.

      या स्पर्धेत 7 ते 9 वर्षा खालील 27 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात  श्रीतेज दिवे दोन्ही प्रकारात ब्राँझ  मेडल मिळवल आहे.
10 ते 11 वर्षा खालील 30 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात  उत्कर्षा गौरव येवले दोन्ही प्रकारात सिल्व्हर मेडल.

10 ते 11 वर्षा खालील 30 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात  वैभव प्रमोद गायकवाड अनुक्रमे गोल्ड व  ब्राँझ मेडल.

12 ते 13 वर्षा खालील 30 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात  चैतन्य डांगे दोन्ही प्रकारात गोल्ड  मेडल.
12 ते 13 वर्षा खालील 55 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात  सिध्दार्थ जालिंदर भापकर दोन्ही प्रकारात गोल्ड  मेडल.

18 ते 20 वर्षा खालील 66 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात  युवराज राधाकिसन आडसुरे दोन्ही प्रकारात गोल्ड  मेडल.
खुला गट 66 किलो वजन 
गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात 
प्रा. गणेश अशोक शेजुळ दोन्ही प्रकारात गोल्ड  मेडल पटकवल आहे.
    सर्व सुवर्ण पदक  विजेत्या खेळाडूंची ऑगस्ट मध्ये तेलंगणा येथे होणाऱ्या  राष्ट्रीय (नॅशनल) स्पर्धे करिता निवड झाली आहे.
      या खेळाडूंना अनंत स्पोर्ट्स चे संचालक , राष्ट्रीय कुस्ती पंच, NIS कुस्ती कोच प्रा. गणेश अशोक शेजुळ
यांचे मार्गदर्शन लाभले.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close