shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

३७ - अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी दाखल केले ६ नामनिर्देशनपत्र

एकूण १३ जणांना १५ नामनिर्देशन पत्राचे वितरण

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक- 2024 अंतर्गत ३७ - अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आज पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले.



निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांनी दोन नामनिर्देशनपत्र, वाबळे भाऊसाहेब बापूराव (भारतीय जवान किसान पार्टी) एक नामनिर्देशनपत्र,नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी) एक नामनिर्देशनपत्र,गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज १३ जणांना १५ नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले असल्याचे जिल्हा निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close