shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कांदिवली पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी !!


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: कांदिवली पोलीस ठाणे मोबाईल  गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम, पोशिक्र  130315/ परमेश्वर चव्हाण व मपोना .क्र.061945/ अंजना यादव या पथकाने कांदिवली पोलीस ठाणे नोंद हरवलेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे प्राप्त माहितीच्या आधारे  निरंतर पाठपुरावा करून सदर मोबाईलचे वापरकर्ता यांचा शोध घेऊन  मुंबई तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार,पश्चिम बंगाल या परराज्यातून एकूण 54 मोबाईल एकूण किंमत 10,17,100/-ची मालमत्ता परत मिळवून तक्रारदाराना परत करण्यात आलेली आहे.                                           


सदरची कामगिरी मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 11, श्री आनंद भोईटे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग, श्री शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वर गणोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांदिवली पोलीस ठाणे, श्री आनंद कांबळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम व  पथकाने पार पाडली आहे.
close