shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सुरज वसंत काळे यांची शिवसेनेच्या इंदापूर तालुक्याच्या प्रभारी तालुका प्रमुख पदी नियुक्ती

सुरज वसंत काळे यांची शिवसेनेच्या  इंदापूर तालुक्याच्या  प्रभारी तालुका प्रमुख पदी नियुक्ती
इंदापूर प्रतिनिधी: पळसदेव चे सुपुत्र तसेच सहकार सेना शिवसेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरज वसंत काळे यांची शिवसेना पक्षातील कार्याची दखल घेत शिवसेना पक्षाच्या  इंदापूर तालुक्याच्या  प्रभारी तालुका प्रमुख पदी नियुक्ती  प्र. संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख पुणे सुरेंद्र शामसुंदर जेवरे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली.

सुदर नियुक्ती  शिवसेनाप्रमुख मा.स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व  संजय मशिलकर संपर्क नेते पुणे, सोलापूर तथा सचिव शिवसेना महाराष्ट्र राज्य यांच्या सुचनेनुसार शिवसेना पक्षाच्या इंदापूर तालुक्याच्या प्रभारी तालुका प्रमुख पदी पळसदेव चे रहिवासी असलेले सुरज वसंत काळे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच  शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार व प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. त्यांना यावेळी नियुक्ती पत्राद्वारे केले आहे.
close