shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पडस्थळ ( रेडकेवस्ती) येथे रामनवमी उत्साहात साजरी

पडस्थळ ( रेडकेवस्ती) येथे रामनवमी उत्साहात साजरी

इंदापूर:- दि. 17 एप्रिल 2024 रोजी पडस्थळ( ता. इंदापूर) येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या रामनवमी उत्सव कार्यक्रमात पंढरपूर येथील फडप्रमुख सतीश महाराज खंदारकर यांनी कीर्तन सेवा बजावली. रेडकेवस्ती येथील श्रीराम मंदिरावर सकाळी दहा ते बारा या वेळात कीर्तनसेवा, पुष्पवृष्टी व महाआरती झाली. तदनंतर महिलांनी श्रीराम जन्मोत्सव पारंपारिक गवळणी, पाळणा, ओव्या म्हणत साजरा केला. प्रसाद म्हणून सुंठवडा, साखर पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिसरातील रामभक्तांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. आलेल्या सर्व भाविकांना जेवणाची व उपवासाच्या फराळाची व्यवस्था केली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्यक्रमाचे आयोजन परशुरामकाका रेडके यांनी केले होते. रामनवमी सोहळ्यासाठी पडस्थळ,चिंधादेवी,आजोती,
शिरसोडी, माळवाडी, पिंपरी, सुगाव, गलांडवाडी येथील भाविकांनी हजेरी लावली. रामनवमीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका गोदावरी मुंडे यांचा पारंपारिक भजन, गवळणी व भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला. गायनासाठी हार्मोनियम वर संभाजी बोंगाणे, पखवाज वादन दादासाहेब आवटे, तबला वादन नामदेव खरात यांनी केले. पाणी वाटप व्यवस्था संत निरंकारी मंडळ यांनी केली. पडस्थळ गावचे राममंदिर हे उजनी पट्ट्यातील एकमेव राम मंदिर आहे.
close