shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

त्रिदल सैनिक सेवा संघाचे मेजर सुनील गवळी व मेजर रविंद्र कुलकर्णी यांची यशाची भरारी !


*प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर आकाशालाही गवसणी घालता येते - मेजर कृष्णा सरदार

श्रीरामपूर प्रतिनिधी:
भारतीय सेनेमध्ये प्रदीर्घ सेवा व मातृभूमीचे रक्षण करून सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विविध परीक्षा देऊन तथा चांगले गुण प्राप्त करून आपण ठरवलेले टार्गेट पूर्ण करत तंत्रज्ञानाचे युग असताना सध्या उच्चशिक्षित ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट एमपीएससी ,यूपीएससी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अभ्यास करून यश संपादन करत त्रिदल सैनिक सेवा संघाचे मेजर सुनील गवळी यांची सहाय्यक अभियंता पदी निवड होवून,सार्वजनिक बांधकाम विभाग (पी.डब्ल्यू.डी.) रत्नागिरी या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. 


त्याचप्रमाणे दोन वर्षाचे कठोर परिश्रम घेऊन मेजर रवींद्र कुलकर्णी यांना औद्योगिक शासकीय प्रशिक्षण संस्था शेगांव‌ येथे डिझेल मेकॅनिक प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. अशा या उच्च पदासाठी ध्यैय बाळगून प्रयत्नांची परामावधी करून ज्ञान संपादन केले आणि सेवानिवृत्ती नंतरही या माजी सैनिकांनी दाखवून दिले की, सैनिक आजही कोणापेक्षा कमी नाही म्हणून मानवाने आपल्या बुद्धीचा वापर हा भाकर शिक्षण नोकरी व राज्यसत्ता मिळवण्यासाठी केला पाहिजे. शिक्षण हे असे शस्त्र आहे की त्याला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, पुस्तक व ग्रंथप्रेमी राहून मन लावून अभ्यास केल्यास व आपले उद्दिष्ट काय आहे नीट समजून घेतल्यास यश निश्चित आहे, जितके महत्त्व आपण सामाजिक व राजकीय चळवळीला देतो तितकच महत्व शिक्षणाला देखील दिले पाहिजे, सामाजिक व आर्थिक दुखण्यावर शिक्षण हेच एकमेव खरं औषध आहे. अभ्यासाशिवाय जगामध्ये कोणालाच काहीही साधता येणार नाही, अपूर्ण विद्यार्जन करून काहीही उपयोग नाही, परीक्षा तर कोणीही पास होतो नुसत्या परीक्षा पास होऊन पदव्या मिळवण्यात अर्थ नाही, रचनात्मक अभ्यास करून मोक्याच्या जागा पटकावल्या तरच त्या परीक्षांना आणि अभ्यासाला महत्त्व आहे. सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्जबाजारी होते, जगात तीच लोकं पुढे जातात जी सूर्याला जागे करतात, आणि जगात तीच लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करतो. संयम ठेवला म्हणुन सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर कितीही कठिण परिस्थिती असो मार्ग हा निघतोच या दोन्हीही माजी सैनिकांचे त्रिदल सैनिक सेवा संघ अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार व शाखा श्रीरामपूरचे तालुका अध्यक्ष संग्रामजीत यादव तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने अभिनंदनासह शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहे.

*पत्रकार अमोल शिरसाठ, श्रीरामपूर
*सहयोगी*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close