shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मतदारांचा वाढता उत्साह धक्कादायक निकाल देणार


श्रीरामपूर प्रतिनिधी:
 शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी एकूण ६२ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाकडून पैशाचे वाटप करण्यात आले नाही तरी देखील उत्स्फूर्तपणे मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदारांचा वाढता उत्साह धक्कादायक निकाल देणार

लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार उत्कर्षा रूपवते आदिसह इतर सतरा उमेदवार रिंगणात होते.मात्र मुख्य लढत लोखंडे,वाकचौरे यांच्यात असून  मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सर्वच ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. विशेष म्हणजे तालुक्यात कोणत्याच पक्षाचे प्रमुख पुढारी फारसे कार्यरत नसताना मतदारांनी स्वतःहून पुढे येत आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी लोकसभेला स्वयंस्फूर्तीने ६० टक्क्याहून अधिक मतदारांनी मतदान केले तरी ४० % मतदार मतदानाला आले नाहीत ही सुद्धा एक लक्षणीय बाब आहे. मतदारांचा हा उत्साह धक्कादायक निकालासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी सपत्नीक मतदान केले तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.आमदार लहू कानडे, माजी आमदार भानूदास मुरकुटे,माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक,माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी आपापले मतदान केले.
शहरामध्ये मतदारांमध्ये खूपच उत्साह दिसून आला.सकाळी सात वाजताच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.काही ठिकाणी मतदान अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामकाजामुळे मतदारांना दोन दोन तास वाट पहावी लागली. शहरातील पंचायत समिती येथे दोन, सिटी सर्वे ऑफिस येथे एक, मॉडेल स्कूल येथे तीन, अलमिजन शाळा येथे दोन,अँगलो ऊर्दू हायस्कूलमध्ये एक, नगरपालिका शाळा क्रमांक चार व पाच मध्ये चार तर नगरपालिका शाळा क्रमांक सहा मध्ये सहा केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. अ.दी. मुळे शाळेतील तीन, श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात सहा मतदान केंद्रांवर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या मतदान केंद्र क्रमांक ६९, ७० आणी ७१ वर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्र क्रमांक ६९  मध्ये मतदान अधिकाऱ्याचे ढिलाईमुळे मतदारांना दोन तास पेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागली. त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेला वेग नसल्याने मोठ्या रांगा दिसून आल्या मात्र सहा वाजेपर्यंत सर्व मतदान झाले होते. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाल्याने व बी एल ओ नी घरोघरी जाऊन मतदान स्लीप वाटप केल्याने मतदारांची संख्या वाढली.वार्ड नंबर दोन मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. स्वयंस्फूर्तीने मतदारांनी यावेळी पुढे येत आपला मतदानाचा हक्क बजावला.
शहरामध्ये सर्वच ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. त्यामुळे कोणतेही वाद विवाद न होता सुरळीतपणे मतदान प्रक्रिया संपन्न झाली. प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे उत्कृष्ट नियोजनामुळे कोठेही मतदानामध्ये अडथळा आला नाही हे विशेष. निवडणूक काळात पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला होता. खासदार वाकचौरे यांचे चिरंजीव रोहित वाकचौरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पै.नानासाहेब खेवरे, शहर प्रमुख संजय छल्लारे, सचिन बडदे, अशोक थोरे मामा तसेच काँग्रेस पक्षाचे सर्वच प्रमुख पुढारी यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक या फारशा सक्रिय दिसून आल्या नाहीत.माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तरी सुद्धा ग्रामीण भागातील मुरकुटे यांच्या कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचे काम केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.
मिल्लतनगर,फातेमा कॉलनी, रामनगर या भागामधील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते सलीमखान पठाण, याकुब शाह, डॉक्टर सलीम शेख, नजीरभाई (मामु) शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे या भागातून सकाळी सात वाजल्यापासूनच मतदार उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडले व त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. याबद्दल मानवता संदेश फाउंडेशन तर्फे मतदारांचे आभार मानण्यात आले.
शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल येथे काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजप नेते प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली सदाशिव लोखंडे यांचे काम केले.समाजवादी पक्षाचे जोएफ जमादार व त्यांच्या सहकार्यांनी वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांचा प्रचार केला.

*बॉक्स* 👇 
----------------------------------------
*पक्ष गेला चुलीत*

या निवडणुकीत कोणत्याच पक्षाने मतदारांना पैशाचे वाटप केले नाही.मात्र शहरातील नगरसेवकांना कार्यकर्त्यांच्या चहापानासाठी खर्च देण्यात आल्याचे समजते.मात्र कोणत्याही नगरसेवकांनी कार्यकर्त्यांना चहापाणी न करता आलेली रक्कम खिशात घातल्याची चर्चा शहरात विविध ठिकाणी होती.
काँग्रेस पक्षाचे मोरगे वस्ती परिसरातील नगरसेवकांनी उघडपणे धनुष्यबाणाचे काम केल्याचे दिसून आले.ससाणे गटाचे हे नगरसेवक सातत्याने हिंदुत्ववादी संघटनांना मदत करतात अशी चर्चा असून याबाबत काँग्रेस पक्षाने आपले धोरण स्पष्ट केले पाहिजे अशी मागणी शहरातील मतदारांनी केली आहे.

*दोन्ही थड्यांवर हात*
शहरात दोन नगरसेवकांनी मशाल व धनुष्यबाण या दोघांना खुश करण्याचे काम केल्याची जोरदार चर्चा होती.मतदारांचा कल पाहून त्यांना आदेश दिले जात होते. काहींना मशालीला मतदान करण्याचे सांगण्यात आले तर काहींना धनुष्यबाणाला मतदान करण्याचे सांगण्यात आले. मशालीला मानणारे जे मतदार होते त्यांना प्रेशर कुकरला मतदान करण्याबाबतही सांगण्यात आल्याची चर्चा आहे.आपला मतदार नाराज होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत या दोन्ही नगरसेवकांनी लोखंडे आणि वाकचौरे दोघांचे काम केल्याचे समजते.दोन्ही थड्यांवर हात ठेवणाऱ्या या प्रवृत्ती बद्दल भविष्यात मतदार काय निर्णय घेणार याबाबत आता उत्सुकता आहे.

*४ जूनला चित्र स्पष्ट होणार*

४ जूनला जाहीर होणाऱ्या निकालामध्ये कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली याची आकडेवारी जाहीर होणार असल्याने आज कोणी काही ही सांगत असले तरी कोणत्या भागातून उमेदवारांना किती मते मिळाली हे जाहीर होणार आहे.

*स्वयं स्फूर्तीने मतदान*
या निवडणुकीत प्रथमताच शहरात कुठेही पैशाचे वाटप झाले नाही. पैसे येणार नाहीत हे मतदारांना सकाळपासूनच माहित झाल्याने मतदारांनी देखील स्वयंस्फूतीने घराबाहेर पडत मतदानात भाग घेतला. मागचा अनुभव असा होता कि पैसे येणार आहेत थांबा असे सांगितले गेल्याने मतदार बाहेर निघत नव्हते.मात्र यावेळी आदल्या रात्रीपासूनच पैसे येणार नाहीत हे जाहीर झाल्याने मतदारांनी सुद्धा आर्थिक आमिषाची वाट न पाहता मतदान केंद्राची वाट धरली आणि उत्स्फूर्तपणे ६५ टक्के पर्यंत मतदान घडून आले.खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया यावेळी तन्वीर शेख यांनी व्यक्त केली.

*दोन गट तरी ही उत्साह कायम
शहरात काँग्रेस पक्षांतर्गत आमदार कानडे गट व करण ससाणे गट कार्यरत आहे. परंतु या निवडणुकीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी वार्ड नंबर दोन मध्ये भाऊसाहेब वाघचौरे यांचे काम केले. नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार व पाच येथे नगरसेवक हाजी मुजफ्फर शेख तर शाळा क्रमांक सहा येथे नगरसेवक हाजी अंजूम शेख आपल्या सहकाऱ्यांसह दिवसभर उपस्थित होते. वार्ड नंबर दोन मध्ये काँग्रेसच्या दोन्ही गटांनी महाविकास आघाडीचे काम केले तर शहराच्या इतर भागात काँग्रेसच्या ससाणे गटातील काही नगरसेवकांनी युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे उघडपणे काम केल्याचे दिसून आले. यावरून ससाणे गटामध्ये एकमत नसल्याची चर्चा गावात होती.

*वाकचौरेंना आघाडी ?
शहरामध्ये रेल्वेच्या अलीकडे धनुष्यबाण व मशालीमध्ये चुरस दिसून आली तर पलीकडच्या भागांमध्ये शंभर पैकी ९५ टक्के मशाल चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील एकूण मतदानाचा विचार करता भाऊसाहेब वाकचौरे यांना शहरातून किमान पंधरा हजार मतांची आघाडी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत खरे काय आणि खोटे काय ते चार जूनलाच स्पष्ट कळणार आहे.

*उत्कर्षा भोवणार ?*
वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना तालुक्यातील काही भागांमध्ये तसेच शहरात काही ठिकाणी चांगले मतदान झाल्याची चर्चा आहे. त्यांना मिळणारी मते ही भाऊसाहेब वाकचौरे यांची आहेत. त्यामुळे उद्या जर काही वेगळा निकाल लागला तर उत्कर्षा रूपवते या कोणाला तरी भोवणार याबाबतही शहरात चर्चा होत आहे.
*वृत्तविशेष सहयोग* 
सलिमखान पठाण (सर) श्रीरामपूर 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close