श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील मेनरोडवरील लोकमान्य टिळक वाचनालय याठिकाणी सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.यावेळी मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन मतदान केंद्रावरती स्वागत करण्यात आले.लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल तथा या मतदान केंद्राच्या नोडल ऑफिसर स्वाती पुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या मतदान केंद्रावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. मतदानाच्या तीन दिवसांपूर्वी हॉल स्वच्छ धुऊन घेण्यात आला तसेच गुलाबी रंगाचे फुगे लावून पडदे लावून मतदान केंद्र सजविण्यात आले.आलेल्या ज्येष्ठ मतदारांसाठी फुले यांनी बुकेची व्यवस्था नगरपालिके मार्फत करण्यात आली होती.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी महिला संचलित मतदान केंद्र क्रमांक १०५ श्रीरामपूर लोकमान्य टिळक वाचनालय येथे सखी मतदान केंद्र (पिंक बूथ) तयार करण्यात आले होते. यामध्ये सेल्फी स्टॅन्ड मतदारांना आकर्षणाचे केंद्र ठरले होते.
मतदान केंद्राला गुलाबी फुगे, गुलाबी पडदे, गुलाबी रंगाची सजावट करण्यात आली होती .मतदान करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार लोकमान्य टिळक वाचनालयाचे ग्रंथपाल,नोडल ऑफिसर स्वाती पुरे,मतदान केंद्राध्यक्ष कल्पना बाविस्कर, संजीवनी खलाटे यांनी स्वागत केले.यावेळी मिना निकम, रंजना कदम,रिना जोशी, वनिता गाडेकर,विना धुस्सा आदी महिला निवडणूक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी महिला संचलित मतदान केंद्र लोकमान्य टिळक वाचनालय येथे सखी मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक
सुलोचना केरबा धुमाळ (वय १०१) यांचा तसेच इतर ज्येष्ठ मतदारांचा पुष्पगुच्छ देऊन स्वाती पुरे यांनी सत्कार केला.केंद्राध्यक्षांपासून शिपायापर्यंत 'सबकुछ महिला', हसतमुखाने मतदारांचे स्वागत करतांना 'बाईपण भारी देवा'चा प्रत्यय आला. गुलाबी रंगाची थीम राबवीत सर्व महिलांनी गुलाबी साड्या व फेटे परिधान केल होते. केंद्राला गुलाबी फुगे, फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात परिसरातील मतदारांनी मतदानाचा आनंद घेतला.
तीन दिवस आधीच या केंद्राच्या सजावटीची तयारी सुरू होती. सकाळी केंद्रावर गुलाबी साड्या व फेटे परिधान केलेल्या महिलांची लगबग पहावयास मिळाली. केंद्रमध्ये फुले, फुगे यांची गुलाबी सजावट होती, तर बाहेर विविध फ्लेक्सद्वारे मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. परिसरातील सर्वांनाच हे नवीन होते. त्यामुळे सकाळपासूनच हे मतदान केंद्र
सर्वांचे आकर्षण ठरले.
नियुक्त सर्व महिला नोडल ऑफिसर स्वाती पुरे,जिल्हा परिषद शिक्षिका कल्पना बाविस्कर या केंद्राध्यक्ष होत्या तर रंजना कदम, रिना जोशी व वनिता गाडेकर या तिघी निवडणूक अधिकारी होत्या तर शिपाई म्हणून सरला लांडे यांनी काम पाहिले. याशिवाय राखीव टीममध्ये केंद्राध्यक्ष मीना निकम, निवडणूक अधिकारी रिना धुस्सा व संजिवनी खलाटे होत्या. वैद्यकीय पथकाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. याची जबाबदारी शिरीन पठाण व अरुणा रोहमारे यांच्याकडे होती. विशेष म्हणजे नियुक्त करण्यात आलेल्या सर्व महिला श्रीरामपूर परिसरातील शिक्षिका व नगरपालिकेच्या कर्मचारी होत्या.
मतदान केंद्रांवर नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक प्रक्रियेचा दबाव दिसून येतो.मात्र या केंद्रावर वेगळेच चैतन्य दिसत होते. सर्व महिला असल्या तरी त्यांनी या प्रक्रियेचा कुठलाही दबाव घेतल्याचे दिसत नव्हते. सर्व मतदारांचे हसून स्वागत केले जात होते. काहींचा सत्कार तर काहीं ज्येष्ठ महिला मतदारांना आधार दिला जात होता.
मतदारांच्या स्वागतासाठी सजावटीबरोबरच कारपेट ही अंथरण्यात आले होते.सकाळी सर्वप्रथम केंद्रावर आलेल्या ज्येष्ठ मतदारांचे स्वागत नोडल ऑफिसर स्वाती पुरे व कल्पना बाविस्कर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर अनेक महिला मतदारांचे सर्व टीमच्या हस्ते स्वागत करण्यात आले.अत्यंत हसतमुख व चैतन्यपूर्ण वातावरणात या केंद्रावर मतदान पार पडले.
महिला पूर्णपणे सक्षम असतात व त्या मतदान केंद्रावरील संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू शकतात. यामुळेच निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात महिला संचालित एक मतदान केंद्र ठेवले. ७५ टक्क्यांहून अधिक मतदान व्हावे यासाठी हा प्रयोग करण्यात आला. श्रीरामपुरात याला चांगला प्रतिसाद लाभला. - किरण सावंत, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी, श्रीरामपूर
----------------------------------------
शासकीय काम करताना महिला देखील कुठेही कमी नाहीत याचा प्रत्येक काल या केंद्रावर काम करताना आला. न्यूडल ऑफिसर म्हणून मी काम करत असताना माझ्या सर्व सहकारी महिला अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे काम अतिशय जबाबदारीने पार पाडले विशेष म्हणजे मतदारांचा मला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला - स्वाती पुरे,नोडल ऑफिसर,ग्रंथपाल,लोकमान्य टिळक वाचनालय श्रीरामपूर
अत्यल्प प्रतिसाद
अत्यंत चांगल्या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आले होते मात्र याची फारशी प्रसिद्धी न झाल्याने प्रचारांचा अल्प प्रतिसाद मिळाला या केंद्रावर 50% मतदान झाले.
*वृत्तविशेष सहयोग
सलिमखान पठाण सर, श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

