shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिर्डी लोकसभेचे उमेदवार विजयराव खाजेकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट


श्रीरामपूर प्रतिनिधी:
नव स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष
व शिर्डी लोकसभेचे उमेदवार विजयराव खाजेकर यांनी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.


श्री.जरांगे पाटील आजारी असल्याने त्यांना संभाजीनगर (औरंगाबाद) येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले असल्याचे कळताच श्री.खाजेकर यांनी तात्काळ संभाजीनगर (औरंगाबाद) येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
याप्रसंगी त्यांच्याशी बोलताना श्री.खाजेकर  म्हणाले की, पाटील साहेब समाजाला आपली गरज आहे,आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी तथा  लवकर बरे व्हावे, आम्ही आपली वाट पाहत आहोत. आम्ही आपल्या सोबत आंदोलनामध्ये होतो, आहोत आणि पुढेही असणार आहे असा शब्दही त्यांनी श्री.जरांगे पाटील यांना दिला. 
यावेळी नव स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शिर्डी लोकसभेचे उमेदवार विजयराव खाजेकर, मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष रमेश नवले, मराठा प्रतिष्ठान सदस्य मधुकर देशमुख, विलासराव खाजेकर ,नव स्वराज्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मिनीनाथ कवडे, नयन साठे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून लवकर बरे होण्यासासाठी शुभेच्छाही दिल्यात.

*पत्रकार राजू मिर्जा
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close