shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार घोषितसोनवणे, मुठे, गवंडी, मोरे, वेताळ मानकरी


०६ मे रोजी पुण्यतिथीला पुरस्कर वितरण सोहळा

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव भागातील इंदिरानगर येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठान व वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे श्रीसंत शिरोमणी गोरा कुंभार यांची ७०७ वी पुण्यतिथी साजरी होणार असून याप्रसंगी श्रीसंत गोरा कुंभार राज्यस्तरीय संतसाहित्य पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. त्यामध्ये संगमनेर येथील प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे, मुठेवाडगांव येथीलं माजी मुख्याध्यापक भागवतराव विठ्ठलराव मुठे पाटील, औंध छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील सोमनाथ फकिरराव मोरे,अकोले येथील माजी मुख्याध्यापक पुंडलिक चिमणराव गवंडी - कुमावत आणि इंदिरानगर येथीलं ह.भ.प. सोपानराव नारायण वेताळ महाराज यांच्या संतसाहित्य निर्मितीस पुरस्कार घोषित झाले आहेत.


  ०९ मे १९९० रोजी श्रीसंत कडुबा उफाडबाबा यांच्या हस्ते श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठान स्थापन होऊन श्रीसंत गोरा कुंभार पुण्यतिथी सुरु झाली. गेल्या ३५ वर्षापासून असे संतसाहित्य लेखन पुरस्कार देण्यात येतात. २०२४ च्या पुरस्कारासाठी राज्यातून २५ ग्रंथ आलेले होते. प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये, पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रा. विलासराव तुळे, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये,सचिव नीतीन जोर्वेकर, कोषाध्यक्षा सौ.मंदाकिनी उपाध्ये, कार्यवाह प्रा.सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे या समितीने पुरस्कार घोषित केले आहेत. प्रा.दिलीप सोनवणे यांच्या ' अभंगवाणी तुकोबांची: एक अन्वयार्थ', भागवतराव मुठे पाटील यांच्या' श्रीमद भागवत रहस्य' संक्षिप्त मराठी अनुवाद, सोमनाथ मोरे यांच्या' पताका' श्रीसंत गोरोबाकाकांची अभंगवाणी', पुंडलिक गवंडी- कुमावत यांच्या' भक्तीचा मळा', ह.भ.प. सोपानराव वेताळ महाराज यांच्या' आत्मचिंतन' अशा पुस्तकांना हे राज्यस्तरीय पुरस्कार ०६ मे २०२४ रोजी सकाळी ०९ वाजता इंदिरानगर येथे प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे लेखन,वाचन प्रेरणा पुरस्कार लातूरचे प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे,श्रीरामपूरचे प्राचार्य शंकरराव अनारसे, सुखदेव सुकळे, लेविन भोसले यांनाही पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे हे प्रमुख पाहुणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकानी केले.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close