शिरसगांव प्रतिनिधी:
पुणे (वाघोली) येथील भूमी फाऊंडेशन ,महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्र , सामाजिक क्षेत्र ,ग्रामीण भाग विकास ,अनाथ निराधार, गरजू मुल- मुली आणि विधवा निराधार महिलांसाठी उत्कृष्टरित्या कार्य करीत आहे.सदर संस्था सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभहस्ते व संस्थापक अध्यक्ष कैलास पवार आणि पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास या ब्रीद वाक्यातून राज्यस्तरीय स्वरूपाचे विधायक कार्य करीत आहे.त्याचबरोबर नव्याने पुणे येथे राज्यातील गरीब ,गरजू एक पालक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या १०० मुलींसाठी मोफत सावित्रीबाई मुलींचे निवासी वसतीगृहाचे उद्घाटन ०१ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सराफ असोसिएशनचे अध्यक्ष नामांकित दानशूर सुवर्ण क्षेत्रातील उद्योजक फत्तेचंदजी रांका यांच्या शुभहस्ते आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे.
अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार आणि पदाधिकारी यांनी दिली आहे.
तसेच या उपयुक्त उपक्रमाकरिता असंख्य सेवाभावी लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज आहे.असे आव्हान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
राज्य प्रसिद्धी प्रमुख
भूमि फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य)
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

