shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मंथन व लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जि.प.प्रा. शाळा मोकळ ओहळ घवघवीत यश..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
शनीवार दिनांक २० एप्रिल २०२४

पालक व ग्रामस्थांकडून विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न..!!

मंथन व लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जि.प.प्रा. शाळा मोकळ ओहळ
 चे घवघवीत यश..!!

राहुरी :  २०२३ - २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा आणि लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा शाळेतील विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. 
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सरपंच , उपसरपंच , शाळा व्यवस्थापन समिती,  पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. 
     राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडला.
उपस्थित सर्व शिक्षक,शिक्षिका,पालक, गुणवंत आणि यश संपादन केलेले विद्यार्थी आणि विद्यार्थीनी , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदी.


💐 मंथन गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत💐

🔵 शिवन्या योगेश घुमे - १२२ गुण केंद्रात द्वितीय क्रमांक राज्यात 15 वा 
🔵 नेत्रा नितीन येवले - ८० गुण
🔵सान्वी सचिन कदम - ७२ गुण
🔵 शिवम संदीप येवले- २१८ केंद्रात प्रथम क्रमांक राज्यात 41 वा 
🔵 सिद्धी गणेश घुमे - १९२
🔵 ध्रुव संदीप कदम - १८२
🔵 अनुष्का सुनील येवले - १८०
🔵 तनुजा ज्ञानदेव कदम - १६०
🔵 तनिष्का बाबासाहेब तोडमल - १४६

💐लक्षवेध  गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत

🔵वेदांत बाबासाहेब तोडमल ९६/१०० राज्यात तृतीय*
🔵 स्वरूप सागर कदम ७८/१००
🔵 आरोही नवनाथ औटी ७८/१०० 
🔵ओम संदीप येवले ६६/१०० 
🔵 राम गणेश घुमे ५४/१०० 
🔵 रोहन सोमनाथ काळे ४० गुण
🔵 मनस्वी नितीन औटी १४२
🔵 दिव्या आदिनाथ जाधव १५०

श्रुती दत्तात्रय येवले...
मिशन आरंभ परीक्षेत पात्र  व वक्तृत्व स्पर्धा तालुक्यात व्दितीय क्रमांक 

चैतन्य नागनाथ फुलमाळी...
५० मीटर धावणे स्पर्धा तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात चौथा क्रमांक. 
       या प्रसंगी सरपंच ,उपसरपंच ,पोलीस पाटील , शाळा व्यवस्थापन समिती,  पालक व ग्रामस्थ व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी बक्षीस  म्हणून रोख स्वरूपात देणगी प्राप्त झाली. 

सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या व सर्व शिक्षकांच्या वतीने पदवीधर शिक्षक श्री. सुनील घाडगे सर यांनी भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता शिंदे यांनी केले. तर शिक्षक दत्तात्रय नागदे, श्रीमती शीतल काळे,  योगेश घुमे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रावसाहेब जाधव  यांनी केले.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close