shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे श्रीसंत गोरा कुंभार विषयक ग्रंथनिर्मिती साठी२०२४ चे राज्यस्तरीय उत्कृष्ठ ग्रंथनिर्मिती  पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  श्रीसंत शिरोमणी गोरा कुंभार यांची पुण्यतिथी ०६ मे २०२४ रोजी विविध उपक्रमांनी सर्वत्र साजरी होणार आहे. श्रीरामपूर येथील इंदिरानगर भागातील साहित्य प्रबोधन मंच, वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ०९ - १९९० पासून श्रीसंत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी श्रीरामपुरात  साहित्यिक विविध उपक्रमांनी गेल्पा ३५ वर्षापासून  साजरी केली जाते. विचारवंतांची प्रबोधन व्याख्याने, लेखन, वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक परिसंवाद आणि संतसाहित्य निर्मिती प्रेरणा पुरस्कार दिले गेले आहेत. यावर्षी २०२३-२४ या काळात श्रीसंत गोरा कुंभार साहित्य निर्मितीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी लेखक, कवी, समीक्षक, विचारवंतांना असे श्रीसंत गोरा कुंभार ग्रंथ पाठविण्याचे आवाहन     संयोजकातर्फे करण्यात आले आहे. 
ग्रंथ पुढील पत्यावर पाठवावेत:

*कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी बाबुराव उपाध्ये, 'निर्मिक',१९१, इंदिरानगर, श्रीदत्त मंदिराजवळ, श्रीरामपूर - ४१३७०९ जि.अहमदनगर* 

साहित्यिकांनी ३० एप्रिल २०२४ पर्यंत ग्रंथ पाठवावेत असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. विलासराव तुळे, सुभाषराव देशमुख, मेजर नंदकुमार सैंदोरे, नीतीन जोर्वेकर, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, सचिव सौ.आरती उपाध्ये, संजय उपाध्ये आदिंनी केले आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close