shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

देशहितवादी'मधून देशभक्ती आणि सेवेचे संस्कार मिळतात- प्रा.दिलीप सोनवणे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर ही साहित्य निर्मितीची पंढरी आहे. या आधुनिक शहरात अनेक साहित्यिक आणि साहित्य संस्था सदैव कार्यरत आहेत.अशा श्रीरामपुरातील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळेसर यांनी लिहिलेले' देशहितवादी' पुस्तक देशभक्ती आणि समाजसेवेचे संस्कार देणारे पुस्तक आहे, असे मत संगमनेर येथील प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील इंदिरानगरमधील ग्रंथा वाचनालयात 'देशहितवादी' पुस्तक परिसंवादात प्रा.दिलीप सोनवणे बोलत होते. स्वागत, प्रास्ताविक करून डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. यावेळी भारतशेठ जोर्वेकर,अनिलशेठ जोर्वेकर, संकेत सोनवणे, सोमनाथशेठ जोर्वेकर यांनी पुस्तकातील कृषि क्रांतीचे सेनानी डॉ. अण्णासाहेब शिंदे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, शिक्षणतपस्वी ऍड. रावसाहेब शिंदे यांच्यावरील प्रसंगाच्या आठवणी सांगत या पुस्तकाचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. असे दर्जेदार पुस्तक लिहिल्याबद्दल लेखक सुखदेव सुकळे यांचे कौतुक केले. प्रा- दिलीप सोनवणे पुढे म्हणाले, या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांची वाचनीय प्रस्तावना लाभली, त्यातूनच या पुस्तकाचा अधिक परिचय होतो. संगमनेर, ठाणगाव, पाडळी , पट्टा किल्ला आदी भागातील स्वातंत्र्य संघर्ष इतिहास येथे साकार झाला आहे, तो आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारा आहे. असे सांगून श्रीरामपूरच्या साहित्य चळवळीची प्रेरणा आम्हाला सदैव मिळते असे ते म्हणाले, आम्ही पुस्तके लिहितो,वाचन करतो, त्यामागे वाचन संस्कृती       प्रतिष्ठानच्या प्रेरणा आहेत. त्यांनी प्रा. डॉ.उपाध्ये,डॉ. शिवाजी काळे, डॉ रामकृष्ण जगताप, संगीता फासाटे आदिंचे कौतुक केले. सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी नियोजन केले तर सौ.आरती उपाध्ये यांनी आभार मानले.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close