shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दान धर्मातून पुण्य लाभते - मीना गागरे


पुणे (वाघोली) प्रतिनिधी:
१९ एप्रिल रोजी कै.वसल्याबाई किसनराव गागरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त सौ.मीना गागरे आणि संजयभाऊ या कुटुंबाच्या वतीने आज हॅपीनेस वृद्धाश्रम येथे असंख्य वृद्धांना भोजन देण्यात आले.आपण लहान असताना असंख्य खस्ता व त्रास सहन करून आपल्या आई- वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केलेले असते आणि त्याच आई वडिलांना आपण उतरत्या काळात वृद्धाश्रमाची सावली दाखवतो हे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे.वृद्धकाळात आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे अशी मानसिकता आज प्रत्येक कुटुंबात निर्माण होण्याची गरज आहे परंतु या दरम्यान त्या वृद्धांना अपमानास्पद वागणूक मिळाल्यास या वृद्धांना अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात म्हणून या काळात वृद्धांची काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन साहित्यिका मीना गागरे यांनी माध्यमांशी बोलताना दिले. 

यावेळी भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांनी सांगितले की, वृद्धाश्रमातील वृद्धांची संख्या वाढण्यापेक्षा कुटुंबातच वृद्धांची काळजी घेणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे.याची जाणीव होणे गरजेचे आहे. तसेच हॅपिनेस्ट वृद्धाश्रमाच्या संचालिका स्टेला मॅडम यांनी सांगितले की या वृद्धांची सेवा करण्याची संधी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळते हे आमचे भाग्य आहे आणि ते काम आम्ही सातत्याने प्रामाणिकपणे करत राहू असे सांगितले.या प्रसंगी मीनाक्षी गागरे, संजय गागरे ,शांतनू गागरे ,अनिता पवार, हरीश अवचर ,स्टेला मेथिल,सूर्यकांत कुलदेवकर आदि मान्यवर उपस्थित होते.

स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close