shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उत्कृष्ठ लेखनासाठी डॉ.दत्ता विघावे यांना गोल्डन बॅज


            क्रिकेटचे सडेतोड व उत्कृष्ठ समिक्षण, सामान्य क्रिकेट रसिकांना मनमुराद आनंद देणारी लेखन शैली, रोचक व रंजक माहिती तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे ऐतिहासिक किस्से व आकडेवारीचा नजराना पेश करणारे सर्वांगसुंदर लेख लिहीणारे डॉ. दत्ता विघावे यांना प्रतिलिपी या ऑनलाईन माध्यमाच्या स्टोरी टेलिंग दुनियेत मोठे नाव असणाऱ्या संस्थेद्वारे ''गोल्डन बॅज" हा बहुमानाचा खिताब देऊन गौरविले आहे.



           ऑक्टोबर -नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे विश्वचषकाचे आपल्या ओघवत्या व रसाळ लेखनाने क्रिकेट वाचकांचे मनोरंजन केल्याबद्दल प्रतिलिपी या स्टोरी टेलिंग संस्थेने "गोल्डन बॅज"  दिल्याचे प्रमाणपत्र संस्थेचे सीईओ रणजित प्रताप सिंग यांनी डॉ. दत्ता विघावे यांना पाठविले आहे.

          डॉ.विघावे हे क्रिकेटचे अतिशय मार्मिक व सटीक समिक्षण करत असून आतापर्यंत तेरा हजारापेक्षा अधिक लेख विविध वृत्तपत्र, साप्ताहिके, दिवाळी अंक, सोशल मिडीया, स्टोरी टेलिंग संस्था, ब्लॉगच्या माध्यमातून प्रसिध्द होत असून सन १९८८ पासून छंदातून सुरू केलेले लेखन डॉ. दत्ता विघावे यांना जागतिक दर्जाचा क्रिकेट समिक्षक बनवून गेले आहे. क्रिकेट समिक्षणा बरोबरच डॉ.विघावे क्रिकेट अंपायरींग व प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. यासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार डॉ. विघावे यांना मिळाले आहेत.
close