श्रीरामपूर प्रतिनिधी:
भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्थेतर्फे २०२१ पासून महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने ०१ मे रोजी होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुणे येथील प्रा.डॉ. कीर्ती ताई मिलिंद मुळीक/यादव यांची निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांनी दिली.
२००१ साली श्रीरामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,२०२२ साली पुणे येथील ज्येष्ठ गझलकार प्रा. तुकाराम पाटील तर २०२३ च्या साहित्य संमेलन अध्यक्षपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या मा.अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिका, प्रकाशिका डॉ. स्नेहल तावरे यांनी भूषविले. २०२४ सालच्या भूमी फौंडेशन आयोजित साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून पुणे येथील एस पी. कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख आहेत. ग्रामीण साहित्य चळवळीचे अध्वर्यू डॉ. आनंद यादव यांच्या त्या सुकन्या आहेत. त्यांची कथा, कविता, समीक्षा अशा विविध प्रकारात अनेक पुस्तके १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ' आनंद यादव: एक साहित्यिक प्रवास' या गौरव ग्रंथास आदर्श शिक्षिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे पुरस्कार, श्रीरामपूर येथील विजयानंद सरगम वाचक ग्रुपचा स्व. विजया कु -हे साहित्य पुरस्कार, वाचन संस्कृती प्रतिष्ठान प्रेरणा पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे नुकताच त्यांच्या' वर्तमान' कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा स्व. पशवंतराव चव्हाण उत्कृष्ठ वाङमय पुरस्कार मिळाला साहित्य विश्वातील प्रतिष्ठित चार पुरस्कार लाभलेल्या त्यांच्या या कथा संग्रहाची मोठी चर्चा आहे. साहित्यिक भगिनी मंडळं, आकाशवाणी कार्यक्रममात त्या सहभागी आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वृत्त विशेष सहयोग
डॉ.बाबुराव उपाध्ये (सर), श्रीरामपूर
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

