shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासातील आधारवड डॉ. सुहास पाखरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा


ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यातील देहरे नगरीत राहत असलेल्या व पंधरा वर्षात माणसांचा एक मोठा गोतावळा निर्माण करणारे शांत, संयमी, हुशार ,कुशाग्र व मदतीला धावून येणारे सामान्य व्यक्तीमत्व म्हणजे प्राध्यापक सुहास पाखरे. अत्यंत सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले व आई वडिलांची गरिबी जाणून आयुष्यात काहीतरी आदर्श करण्याचे ध्येय घेऊन लहानपणापासूनच अभ्यासाची रुची असलेले तसेच प्रथम इंजीनियरिंग नंतर एमबीए पदवी घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आगळावेगळा ध्यास घेत परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी येथे नोकरी करत आपला प्रवास सुरू केला. राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व व श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार बबनरावजी पाचपुते यांच्या परिक्रमा शैक्षणिक संस्थेत कार्य करत असताना राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात हजारोंच्या संख्येने माणसांचा गोतावळा तयार करणारे प्रा. सुहास पाखरे होत. 

लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची फार आवड होती तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रिकेट  क्षेत्रात त्यांचा एक नाव लौकिक आहे. त्यांच्या अंगी असलेला एक महत्त्वाचा गुण म्हणजे एक उत्कृष्ट वक्ते सुद्धा आहेत. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार सूत्रसंचालन व उत्कृष्ट नियोजन करण्यात त्यांचा हातकंडा आहे .काही वर्षे त्यांनी डॉ.डी वाय पाटील तळेगाव पुणे व अडसूळ शैक्षणिक संकुल अहमदनगर येथे व्यवस्थापन क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम केले .ते आता सध्या नवसह्याद्री शैक्षणिक संकुल नायगाव, पुणे येथे एमबीए विभागात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत .अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांशी सुसंवाद करून त्यांना आधुनिक जगाची ओळख करून त्यांच्यात संघटन कौशल्य निर्माण करण्यात ते पटाईत आहेत .नव सह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पोपटरावजी सुके साहेब ,ग्रुप संचालक माननीय सागर जी सुके सर व नव सह्याद्री एमबीएमसीए विभागाचे संचालक डॉ.तानाजी दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या उपक्रमात ते नेहमी अग्रेसर असतात. अगदी कमी वयात त्यांनी रोम, इटली, पॅरिस, बेल्जियम ,स्वित्झर्लंड, नेदरलँड , व थायलंड अशा विविध देशात आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घेऊन अभ्यास दौरे केले आहेत. करोना च्या अगदी  वाईट दिवसात सामाजिक प्रबोधन व उपक्रम घेऊन माणुसकीचा धर्म जपला. २०२१ मध्ये त्यांना 'राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक ' व २०२२ मध्ये 'भारतीय गौरव सन्मान 'पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या यशामागे आई-वडील ,पत्नी , मुली ,भाऊ , नातेवाईक व सर्व मित्र परिवार नेहमीच खंबीरपणे उभा असतो. नगर- पारनेर मतदार संघाचे आमदार व जागतिक करोना योद्धा माननीय निलेशजी लंके साहेब यांचे अगदी जवळचे मित्र व राजकीय उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजक म्हणून ते ओळखले जातात. आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाया भक्कम करून त्यांना विविध क्षेत्रात अग्रेसर करणाऱ्या डॉ. सुहास पाखरे 00यांचा विद्यार्थी समूह दांडगा अशा या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाला राजकीय , शैक्षणिक,आर्थिक ,धार्मिक, अध्यात्मिक ,सांस्कृतिक, क्रीडा, प्राध्यापक वर्ग, पत्रकार मित्र ,इतर सर्व क्षेत्रातून उदंड आयुष्याच्या मन भरून शुभेच्छा ..!
close