shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नवज्योती महिला मंडळाच्या सचिव पदी शितल जैन विराजमान



 शितल जैन यांचा अल्पावधीत नावलौकिक


एकमेकांना सहकार्य करा - शितल जैन

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नाशिक :   दि . २२ /   नवज्योती महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा दि . २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अभिषेक प्लाझा म्हसरूळ नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या पदग्रहण सोहळ्यात नवीन अध्यक्षांचे स्वागत व मागील अध्यक्षांना निरोप देण्यात आला.  या प्रसंगी नूतन अध्यक्षा सौ. अलका फळे व नूतन सचिव सौ. शितल जैन यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला .या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. ऊर्जा अभय पाटील (मानसतज्ञ व समुपदेशक) यांची विशेष उपस्थिती होती .

यावेळी नुतन सचिव शितल जैन यांनी सांगितले की, महिला मंडळाच्या माध्यमातुन आम्ही स्वतःला व्यक्त करायला शिकलो , हसायला शिकलो तसेच इतरांना प्रोत्साहन द्यायला शिकलो . महिलांनी एकमेकांच्या सहकार्याने सर्वांना घेवून प्रगती साध्य केली पाहिजे . मिळालेल्या पदाच्या माध्यमातुन महिला मंडळाच्या विविध उपक्रमांना यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले .
यावेळी व्यासपीठावर  मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा प्रतिभा मेहता, अध्यक्षा दक्षणा औटी, सचिव प्रतीक्षा नातू  तसेच मंडळाचे सर्व माजी अध्यक्षा सर्व मंडळाचे सदस्य उपस्थित होते. मंडळा मार्फत गत वर्षभरात शैक्षणिक, मनोरंजनात्मक, आरोग्य विषयक, बौद्धिक, तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम घेण्यात आले. सूत्रसंचालन पारुल दिवाणी यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व सभासदांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला .कार्यक्रमात  नवज्योती सभासद मैत्रिणींची उल्लेखनीय उपस्थिती दिसुन आली.
close