shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिगवण पोलीस स्टेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा.

भिगवण पोलीस स्टेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा. 
पोलीस अमलदार सचिन पवार यांचा पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गुणगौरव.  


  प्रा. सागर घरत.
 भिगवण: पोलीस खात्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात येतो.  गेल्या सोळा वर्षाच्या पोलीस सेवेमध्ये भिगवन पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस अमलदार सचिन पवार यांनी खून, खुनाचा प्रयत्न ,दरोडा ,जबरी चोरी ,अवैद्य अमली पदार्थ कारवाई अशा विविध स्वरूपाच्या कारवाईंमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सचिन पवार यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना पोलीस महासंचालक विशेष सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
close