संगमनेर प्रतिनिधी:
लग्न सोहळा म्हटलं की तेथे खर्च येतोच खर्च म्हटला की माणूस हा कर्जबाजारी होतोच. त्यामुळे वधू वरच्या दोन्ही बाजूकडील लोकांनी अनावश्यक खर्च टाळून आवश्यक त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आज नितांत गरज असल्याचे आदर्श सरपंच भास्कर राव पेरे पाटील म्हणाले.
संगमनेर येथे भाऊसाहेब आप्पासाहेब कुरकुटे यांचे प्रथम चिरंजीव वैभव आणि बाबासाहेब किसनराव वाबळे यांची कन्या यांच्या विवाहप्रसंगी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित असताना ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दिवसांदिवस जग फार वेगवान होत चालले आहे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे.धावत्या युगाबरोबर आज प्रत्येकाने बदलणं काळाची गरज आहे.त्यामुळे लग्न साधी करा,अनावश्यक खर्च टाळा असे ते म्हणाले.
याप्रसंगी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांच्यासह वधू - वरांकडील मान्यवर मंडळी आदि.उपस्थित होते.
*पत्रकार लियाकतखान पठाण*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

