आदर्श शिक्षण,खेळ आणि व्यायामाने सुदृढ आणि सक्षम विद्यार्थी घडतो.पोलीस अधीक्षक IPS जीवन बेनिवाल .
श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा मुंगसेवस्ती या शाळेसमंगळवार दि.16/04/2024 रोजी आय.पी.एस. जीवन बेनिवाल यांनी भेट दिली.प्रथमतः त्यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत ,मुलांनी स्वागत गीतांनी केले.शाळा मुंगसेवस्ती आणि वळदगाव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.शाळेचा परिसर, भौतिक सुविधा,पाहुन त्यांनी आनंद व्यक्त केला. IPS जीवन बेनिवाल यांनी शाळेतील मुला,मुलींना टिफीन डब्बा, मिठाई, फ्रुटी आणि शालेय साहित्य त्यांच्या हस्ते केले .
IPS जीवन बेनिवाल यांनी आपल्या मनोगतात मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे.
शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान
वाढवावे.शिक्षणामुळे कुटूंबाचा,देशाचा विकास होतो. एक आदर्श नागरिक तयार होतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी मुलांनी व्यायाम आणि खेळ यांची आवड निर्माण करावी.शाळेला जागा दिल्यामुळे मा.पंढरीनाथ मुंगसे आप्पा यांचा IPS जीवन बेनिवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . समाजातील अशा चांगल्या विचारांची, निस्वार्थी माणसे यांच्या मुळे समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचे सहकार्य मिळते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या कार्याचा इतिहास समजावून सांगितला.त्यांनी मुख्याध्यापक दिलीप शेंडे सर, अमोल गट सर, सुजाता रांधवणे मॅडम या शिक्षकांचे आणि, ग्रामस्थांचे कौतुक केले.त्यांनी मुलांबरोबर हिंदीतून संवाद साधला असता मुलांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याने मुलांचे कौतुक केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती बेलापुर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले.श्रीरामपूर गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम, शिक्षणविस्तार अधिकारी संजीवन दिवे साहेब,मंगलताई गायकवाड, पढेगाव केंद्रप्रमुख राजू इनामदार यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले. अमोल गट सर, सुजाता रांधवणे मॅडम यांनी यशस्वीपणे नियोजन केले.
कार्यक्रमास वळदगाव उपसरपंच प्रकाशआण्णा भोसले, पंढरीनाथ मुंगसे , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गोपाळे, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, दादा मुंगसे , हवालदार रणनवरे दादा,शेख दादा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव बेलापुर चे मयूर खरात, किरण अमोलिक, गौरव वाकडे स्वप्निल अमोलिक, विशाल भिंगारदिवे, बेलापूर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक उपस्थित होते.
*पत्रकार सौ. सुनंदाताई शेंडे
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

