श्रीरामपूर प्रतिनिधी:
आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांच्या वतीने श्रीरामपूर शहरात आनंद अनुभूती शिबिर तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, शिबिरामध्ये सुदर्शन क्रिया योग आणि ध्यान परस्परसंवादी प्रक्रिया व्यावहारिक शहाणपण तसेच अनुभूती तणावमुक्त शांत आणि प्रसन्न मन शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्साह आणि सकारात्मकता एकाग्रता आणि संवाद कौशल्य भावनिक स्थैर्य आणि सजगता आदि.विषयी असणार आहे.
शिबिर कालावधी दिनांक २३ ते २८ एप्रिल २०२४ असे सहा दिवसांचे असून वेळ- संध्याकाळी ६ ते ९ ,ठिकाण - ऋषिकेश नाबरिया यांचे हॉल,सावता महाराज रोड, अन्नपुर्णा निवास, वॉर्ड नं ३, श्रीरामपुर याठिकाणी संपन्न होणार असून,प्रशिक्षक श्री. सतीश आहेर हे असणार आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्ती या शिबिरात सहभागी होऊ शकतात असे आयोजकां तर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

