shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेंव्हाही आंबेडकर ! आजही आंबेडकरb


काँग्रेसचे शिष्टमंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले आणि आपल्याला इंग्रजांना हाकलून लावायचे आहे म्हणून तुम्ही काँग्रेसमध्ये सामील व्हा अशी विनंती केली. बाबासाहेबांनी शिष्ट मंडळाला प्रश्न केला की, मी तुम्हाला साथ दिली तर तुम्ही स्वातंत्र्यानंतर माझ्या समाजाला हक्क अधिकार देणार का?. यावर काँग्रेसचे शिष्ट मंडळ ठोस उत्तर देऊ शकले नाही. तेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "पारतंत्र्यात ज्यांच्या बाता सहन होत नाही, स्वातंत्र्यात आम्हाला त्यांच्या लाथा खाव्या लागतील ". आम्ही गुलामांचेही गुलाम आहोत. माझी पहिली लढाई माझ्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी आहे. मी तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही.






             यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अपप्रचार सुरू केला की " डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांचे एजंट आहेत " थोडक्यात तेंव्हाही काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांची "B टीम" ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबासाहेब डगमगले नाहीत. त्यांचा लढा
 ते लढत राहिले आणि भारताचे संविधान लिहून करोडो दीन दुबळ्याचे आयुष्य त्यांनी बदलून टाकले.
                आज कालचक्र पुन्हा फिरले आहे. भाजपला हरवण्यासाठी आम्ही देऊ तेव्हढ्या जागा ( तुकडे ) घ्या आणि आमच्यात सामील व्हा असा प्रस्ताव महाविकास आघाडीने बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांना दिला. मात्र तुमचा अजेंडा साध्य करण्यासाठी मी लाचारी पत्करणार नाही असे बाळासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला. आज पुन्हा काँग्रेसकडून बाबासाहेबांच्या नातवाला भाजपची "B टीम" ठरवण्याचा प्रयत्न होतोय. तसा अपप्रचारही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय.
                  अपप्रचारामुळे डगमगेल तो बाबासाहेबांचा नातू कसला. बाळासाहेब आंबेडकर देखील आपला लढा निर्धारित करून विरोधकांच्या डोळ्यात डोळे घालून आव्हान देत आहेत. जी इतर आंबेडकरी आणि बहुजन नेत्यांना जमली नाही, ती राजकीय रणनीती खेळत बाळासाहेब वंचित घटकांना सत्ताधारी बनवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. 
           ध्यानात घ्या, जेंव्हा आपले सामाजीक अस्तित्व धोक्यात होते तेंव्हाही आंबेडकर मैदानात होते आणि आज जेंव्हा आपले राजकीय अस्तित्व धोक्यात आहे तेंव्हाही आंबेडकरच मैदानात आहेत. कुणाच्या बाजूने उभे रहायचे हा निर्णय आपल्याला घ्यायचाय. बाळासाहेब आंबेडकर जेंव्हा समाजाच्या अस्तित्वाची लढाई लढत होते तेंव्हा तुम्ही काय करत होता? असा प्रश्न जेंव्हा येणाऱ्या पिढ्या विचारतील, तेंव्हा काय उत्तर द्याल?. इतिहासात माझी नोंद गद्दार म्हणून होऊ नये यासाठी मी तरी आंबेडकरांसोबत राहणार... आणि तुम्ही?...
close